esakal | Ganesh Chaturthi 2021: पारंपारिक महाराष्ट्रीय परफेक्ट लुकसाठी 'या' टिप्स फॉलो करा
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपारिक महाराष्ट्रीय परफेक्ट लुकसाठी 'या' टिप्स फॉलो करा

पारंपारिक महाराष्ट्रीय परफेक्ट लुकसाठी 'या' टिप्स फॉलो करा

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या आगमनापूर्वीच तयारी जोरात सुरू होते. आणि गणपती विसर्जनापर्यंत खूप धूम असते. या दरम्यान, महाराष्ट्रातील महिला देखील त्यांच्या पारंपारिक शैलीत दिसतात. आज सकाळपासूनच अनेकांनी बाप्पाचे आगमन ढोल, ताश्यांनी केले आहे. त्यातच बालचमूंचा जल्लोश सगळीकडे दिसत आहे. या उत्सवात महाराष्ट्रीय वेशभूषेला विशेष महत्व दिले जाते. काट पदराची साडी, त्यावर वेगवेगळी ज्वलेरी परीधान केलेल्या अनेक भगिनीं आपल्याला या दिवसात दिसतात. आपण कसे परफेक्ट दिसू याकडे विशेष लक्ष दिले जाते. आज तुम्हाला महाराष्ट्रीय साडी सोबत कसा मेकअप लुक असावा याच्या काही टिप्स देणार आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

महाराष्ट्रीय मेकअप करण्यासाठी आधी चेहऱ्यावर फाउंडेशन लावा. डोळ्यांवर काजळ, लाइनर लावा आणि साडीशी मॅचिंग आयलाइनर लावा. तुम्ही गालांवर हलका ब्लशर लावू शकता. आता बिंदीसाठी कपाळावर कुमकुम लावा, तुम्ही लाल आणि पांढरा कुमकुम वापरू शकता.केसांचा अंबाडा बनवा आणि त्यात गजरा लावा. आता नथ घाला. जर तुमच्या नाकात छिद्र नसेल तर तुम्ही नकली नाकाची अंगठी देखील घालू शकता. हनुवटीवर तीन काळे ठिपके लावा. आणि हातात हिरव्या काचेच्या बांगड्या घाला. तुम्ही गळ्यात छोटे दागिने देखील घालू शकता.

जर तुमच्याकडे नऊवारी साडी नसेल तर तुम्ही सहावारी साडी घालू शकता. यासाठी आधी कंबरेभोवती साडी गुंडाळून समोर आणा आणि समोर गाठ बांधून घ्या. आता साडी लहान टोकाला धरून पायांच्या मधून बाहेर काढा आणि कंबरेच्या मध्यभागी ठेवा.आता साडीचे लांब टोक धरून ठेवा. त्याच्या 5 ते 6 प्लेट्स बनवा. आता ते कंबरेच्या मध्यभागी पुढे ठेवा. लक्षात ठेवा की प्लेट्सचा चेहरा डाव्या दिशेने असावा. आता पल्लूच्या 4 ते 5 प्लेट्स बनवा. कंबरेच्या मागच्या बाजूने समोरून आणा आणि पिनसह सेट करा.

मेकअप सेट करण्यासाठी महत्वाच्या टिप्स

- मेकअपची सुरुवात माॅश्च राझर लावून करा..

- मेकअप उतरवताना Cleansing करून काढा.

loading image
go to top