esakal | Ganesh Chaturthi vidhi sahitya: श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजनाचे साहित्य
sakal

बोलून बातमी शोधा

 Ganesh idols

श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजनाचे साहित्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारातून खाली नमूद केलेल्या गोष्टी आणाव्यात. हे पूजेचे साहित्य निवडून, स्वच्छ करून पूजेच्या थाळीत, तबकांत, टोपल्यात नीट लावून ठेवावे. (Ganesh Chaturthi vidhi sahitya in Marathi)

स्वच्छ हळकुंडे दळून केलेली हळद पूड (मोठी वाटीभर), उत्तम सुवासिक (महाराष्ट्रात पंढरपुरी) कुंकू ( लहान-मोठी वाटी), अष्टगंध डबी, शेंदूर डबी, बुक्का, गुलाल, रांगोळी, वासाची फुले (गुलाब, चाफा, जाई-जुई, शेवंती, कमळ, केवडा, सोनटक्का इत्यादी), निवडलेल्या दूर्वांची 21-21 ची बांधलेली जुडी, पत्री पूजेसाठी वृक्षवल्लींची पाने, जानवी जोड, वीस ते पंचवीस विड्याची पाने, सुपारी नग -10, बदाम - खारीक प्रत्येकी पाच, रुपयाची नाणी, खोबरे वाटी, गूळ, खोबरे बारीक किसून खसखस, खडीसाखर, खजूर-बेदाण्यासह पंचखाद्य (वाटी किंवा अधिक प्रसाद वाटण्यासाठी), उकडलेले / तळलेले अगर खव्याचे (पेढे) मोदक - 21, निरनिराळी फळे - 21, अत्तर, गुलाब, गणपतीसाठी लाल/भगव्या रंगाचे नवीन वस्त्र, उद्‌बत्ती, तूप-वातीची दोन निरांजने, तेल-वात, समई, स्वच्छ निवडलेले तांदूळ - सव्वा किलो, नारळ (सोललेले) - पाच, कापूर डबी, चांदीचे/तांब्याचे/पितळेचे पळी-भांडे, ताम्हन, तबक, उगाळलेले चंदन - 1 वाटी, शंख, घंटा, वस्त्राने झाकलेली केळी, कर्दळीच्या खांबांनी सजवलेला चौरंग, श्रींची मूर्ती, पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळाले असतील तर रु.101, 51, 21 यांपैकी यथाशक्ती संभावना (दक्षिणा), गुरुजी मिळाले नाहीत आणि ध्वनिवर्धक लावून पूजा केली तर गुरुजींच्या नावे हा सन्मान गुरुगृही किंवा मंदिरांत पोहोचवावा.

loading image
go to top