esakal | पुणे : दगडूशेठ हलवाई गणपतीचं हौदात विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Ganesh Visarjan 2021

पुणे : दगडूशेठ हलवाई गणपतीचं हौदात विसर्जन

sakal_logo
By
सुधीर काकडे

पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविड च्या परिस्थितीत होणार नाही...मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर 45 मिनिटानंतर क्रमवारीनुसार इतर मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंडपामधील हौदात विधिवत विसर्जन झाले.

Pune Ganesh Visrjan

Pune Ganesh Visrjan

बंदी असतानाही मंडळांनी उधळला गुलाल अन् भंडारा जोरदार ढोल वादन

मानाच्या गणपतीसह इतर मंडळांनी साधेपणाने विसर्जन करण्याचे आवाहन केले असले तरी मानाचा तिसरा गुरूजी तालीम मंडळाने गुलाल उधळून आणि ढोल वादन करत जल्लोषात विसर्जन केले. मानाचा चौथ्या तुळशीबाग मंडळानेही ढोल वादन करून छोटेखानी मिरवणूक काढल्याने वाद ओढवून घेतला. तर श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाने भंडारा उधळून जल्‍लोष केला.

केसरी वाडा गणपतीचे विसर्जन

केसरी वाडा गणपतीचे विसर्जन

मानाच्या पाचव्या केसरी गणपतीचं वेळेआधीच विसर्जन करण्यात आले आहे. १:२० मिनीटांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

तुळशी बाग गणपतीचे विसर्जन

तुळशी बाग गणपतीचे विसर्जन

तुळशीबाग मंडळाने पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. विसर्जनासाठी आकर्षक गजकुंड तयार करण्यात आला होता. उत्सव मंडपात गणरायाचे विसर्जन करण्यात विसर्जन करण्यात आले आहे.

मुळा नदी घाट

मुळा नदी घाट

मुळा नदी घाटावर पोलीस बंदोबस्त नसल्याने आणि हौदाची व्यवस्था नसल्याने भाविक नदी पत्रात विसर्जन करीत आहेत.

गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन

गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन

गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात साडेबारा वाजता विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यासाठी पर्यावरण पूरक हौद निर्माण करण्यात आला होता.

तुळशी बाग गणपती मंडळाच्या ढोल ताशा पथकाला पोलिसांनी रोखलं.

कोरोना महामारीचे सावट असल्याने पुण्यात मिरवणुकीला बंदी आहे. मात्र पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यामुळे पोलिसांनी ढोल ताशा पथकाला रोखलं आहे. यावेळी पोलील आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली.

सरकारच्या गाईडलाइन्सनुसार, कुणालाही शहरात गणपती विसर्जनासाठी परवानगी दिलेली नाही. गणेश मंडळांनी देखील विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे - अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

गुरुजी तालीम गणपती विसर्जन सोहळा

गुरुजी तालीम गणपती विसर्जन सोहळा

गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची आरती सुरू झाली असून, थोड्याच वेळात विसर्जन करण्यात येणार आहे.

तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा

तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती अर्थातच तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले आहे.

कसबा गणपतीचे विसर्जन

कसबा गणपतीचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे अर्थातच कसबा गणपतीचे विसर्जन झाले आहे. कोरोना महामारीच्या सावटामूळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. कसबा गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून गणपतीच्या पालखीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पोलिस सह अतिरिक्त उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी उपस्थिती लावली.

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन सोहळा

loading image
go to top