esakal | बार्शीत 15 हजार गणेशमूर्तींचे केले प्रशासनाने विसर्जन!
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शीत 15 हजार गणेशमूर्तींचे केले प्रशासनाने विसर्जन!

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' असा जयघोष करीत नागरिकांनी भक्तिभावाने नगरपरिषद प्रशासनाकडे गणेशमूर्ती दिल्या.

बार्शीत 15 हजार गणेशमूर्तींचे केले प्रशासनाने विसर्जन!

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' असा जयघोष करीत नागरिकांनी भक्तिभावाने नगरपरिषद प्रशासनाकडे गणेशमूर्ती दिल्या. रविवारी अनंत चतुर्दशी (Ganesh Visarjan)दिवशी सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत संकलित केलेल्या शहरातील सुमारे 15 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन रात्री दहा वाजेपर्यंत दोन तलावांत प्रशासनाने केले. कोणतीही मिरवणूक निघाली नाही; मात्र भाविकांचा उत्साह मात्र दिसून आला. मोठ्या प्रमाणात पोलिस (Mohol Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा: मोहोळ तालुक्यात सामाजिक उपक्रमाद्वारे शांततेत गणेश विसर्जन

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी होऊ नये यासाठी शहरातील दहा ठिकाणी गणेशमूर्ती संकलन व्यवस्था केली होती. संकेश्वर उद्यान, एकविराई चौक, मंगळवार पेठ, टिळक चौक, लहूजी वस्ताद चौक, भाऊसाहेब झाडबुके व्यापारी संकुल, पांडे चौक, पोस्ट चौक, बसस्थानक चौक, रमाई चौक येथे गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. नगरपरिषदेसमोर सकाळी नऊ वाजता नगराध्यक्ष असिफ तांबोळी, गटनेते विजय राऊत यांच्या हस्ते गणेशमूर्ती वाहतूक करणाऱ्या वीस वाहनांचे पूजन करण्यात आले. कुमार कोठारी, विजय राऊत, विनोद बोटकर, मधू चंडक, मंदार कुलकर्णी यांनी वाहनांची मोफत सेवा दिली होती.

हेही वाचा: अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे ठरले 'रिअल सिंघम'

गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेने टीम तयार केल्या होत्या. एका टीममध्ये सात जणांसह एक पोलिस कर्मचारी, विसर्जन पथक, अग्निशमन दल असे दोनशे जणांना नियुक्त करण्यात आले होते. गणेश तलाव येथे हौद तर राऊत तळे येथे गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक रामदास शेळके, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगरअभियंता भारत विधाते, मिळकत व्यवस्थापक महादेव बोकेफोडे, प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे, जलदाय अभियंता अजय होनखांबे, आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद यांच्यासह नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शांततेत गणेशमूर्ती विसर्जन केले.

loading image
go to top