esakal | आरतीपासून महाप्रसादापर्यंत राजकारण्यांची 'फिल्डिंग'; गणेशोत्सवावर राजकीय 'डावपेच'
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2021

पालिकेच्या राजकारणाचे सप्तरंग स्पष्टपणे दिसत आहेत. त्याच्या जोडीला आलेला गणेशोत्सव अधिक रंगतदार होणार आहे.

आरतीपासून महाप्रसादापर्यंत राजकारण्यांची 'फिल्डिंग'

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पालिकांच्या निवडणुकांचं (Karad Municipal Election) वारं शहरात घोंघावत आहे. त्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) आल्याने तो काळ राजकीय बांधणीसाठी इच्छुकांना महत्वाचा असतो. उत्सवाला आजपासून सुरवात होत आहे. त्यामुळे त्या दहा दिवसांच्या काळात आरतीपासून महाप्रसादापर्यंतचा प्रत्येक इव्हेंट कॅच करण्यासाठी राजकारण्यांची फिल्डिंग लागलीय. गणेशोत्सवावर कोरोनाचा (Coronavirus) सावट आहेच, त्याहीपेक्षा राजकीय डावपेचांचीही सावली अधिक घट्ट होताना दिसतेय. त्यामुळे त्या काळात राजकीय ज्वर अधिक वाढणार आहे.

पालिकेच्या राजकारणाची गणितं सध्या बेरीज-वजाच्या आडाख्यात आहेत. अनेकांची स्वतंत्र विचारसरणी कामाला लागलीय. चार महिन्यात विद्यमान नगरसवेकांची मुदत संपत आहे, मात्र कोरोना व आरक्षणाच्या मुद्यावर निवडणुकांबाबत अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे कदाचित प्रशासकाची नियुक्ती होवू शकते. त्यामुळे राहिलेल्या काळात अधिकाधिक काम करून घेण्यासाठी प्रत्येक नगरसवेवक झटत आङेत. त्याच काळात अधिक लोकाभिमुख असल्याची एकही संधी कोणीही गमावता दिसत नाहीत. शासनाने सिंगल वॉर्डनिहाय प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा आणि हालचालीला गती आलीय. कोण कोठे असणार यापेक्षा आहेत, त्या स्थितीतील वातवरण आपल्याला फेव्हर करून घेण्यासाठी आघाड्यांच्या नेत्यांसह प्रत्येक नगरसेवक झटतो आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणाचे सप्तरंग स्पष्टपणे दिसत आहेत. त्याच्या जोडीला आलेल्या गणेशोत्सव अधिक रंगतदार होणार आहे. उत्सव कोरोनाचे नियम पाळून होणार आहे. सण साजरा करताना अनेक बंधनेही आहेत. तरीही त्या नियंमाचे पालन करून होणारा उत्सव व त्यात सहभागी होणार युवक कार्यकर्ता खिशात कसा टाकता येईल, यासाठी आघाड्यांनी रणनीती बनवलीय.

हेही वाचा: जुलमी मोदी सरकार खोटी स्वप्नं दाखवून सत्तेत; नाना पटोलेंचा घणाघात

उत्सव काळातील प्रत्येक मुव्हमेंट हाच खरा इव्हेंट असतो. तो कॅच करण्यासाठी प्रत्येक नेते त्यांचे नियोजन करताना दिसताहेत. कोणते मंडळ वजनदार आहे, कोणत्या मंडळाचे कार्यकर्ते जास्त आहेत, भागनिहाय मानाचा गणपती कोणता आहे. कोणत्या गणेश मंडळाचे सामाजिक योगदान आहे, वॉर्डात कोण गेमचेंजर ठरू शकतो, याच्या आडाख्यांची यादी प्रत्येक आघाड्यांनी तयार केलीय. नेत्यांकडून गणेशोत्सव कॅच करण्याची तयारी आखलीय. त्यात उत्सव काळातील आरती, वर्गणीसह महाप्रसादापर्यंतचा सगळा भार नेत्यांनी त्याच्या खांद्यावर उचलण्याची तयारी दाखवत त्याचा खर्च केल्याची चर्चा आहे. एका मंडळासाठी दोन-दोन नेते आता सध्या तरी कार्यरत आहेत. त्यामुळे येत्या उत्सव काळात वाढणारी राजकीय स्पर्धा ही प्रत्येक गणेश भक्तापेक्षाही अधिक ताकदीची ठरणार आहे.

हेही वाचा: कंगना रनौतचा 'थलायवी' चित्रपट आज होणार प्रदर्शित

प्रत्येक कार्यात पुढेच...

वॉर्डनिहाय होणाऱ्या निवडणुकांमुळे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला एक उंची प्राप्त झालीय. सध्या तरी प्रत्येक इच्छुकांसह आजी-माजी नगरसवेक त्या मंडळाच्या समस्या मांडण्यासाठी पुढे-पुढे करताना दिसतोय. इतरववेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना शहाणे व्हा, असा डोस पाजणारे शासकीय बैठकीत, शासकीय अधिकाऱ्यांसह पालिकेच्या प्रशासकीय पातळीवर मंडळांच्या बाजू मांडताना दिसताहेत. मंडळातील कार्यकर्त्यांना हा बदल नवा नाही, कारण प्रत्येक पाच वर्षाला असा अचानक कळवळा आलेले इच्छुक प्रत्येक मंडळापुढे येत असतात. त्यामुळे मंडळेही काहीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत.

loading image
go to top