गणेश पुजनाची योग्य वेळ कोणती?

- दा. कृ. सोमण
Sunday, 1 September 2019

गणेशचतुर्थीला गणपतीचे पूजन मध्यान्ह काळी करावे, असे शास्त्र सांगते. त्यानुसार दुपारी 11 वाजून 23 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ आहे, त्याचवेळी गणेशपूजन करावे.

गणेशचतुर्थीला गणपतीचे पूजन मध्यान्ह काळी करावे, असे शास्त्र सांगते. त्यानुसार दुपारी 11 वाजून 23 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ आहे, त्याचवेळी गणेशपूजन करावे.

अर्थात ही वेळ पाळणे सगळ्यांना शक्‍य नसते, त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत केव्हाही गणपतीचे पूजन केले तरी चालेल. 

सकाळी राहुकाल असल्यामुळे गणपतीचे पूजन करू नये, असे वॉट्‌सअप मेसेज फिरत आहेत. मात्र ते चुकीचे आहेत, राहुकालाचा गणपती पूजनाशी काहीही संबंध नाही.

(लेखक पंचागकर्ते आणि प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)
(शब्दांकन : कृष्ण जोशी)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is right time of Ganesh Puja