नैवैद्य बाप्पाचा:  बटाट्याच्या वड्या

सुप्रिया खासनीस
Thursday, 20 August 2020

साहित्य - बटाटे, साखर, वेलदोडा पूड, पुरेसे तूप

साहित्य - बटाटे, साखर, वेलदोडा पूड, पुरेसे तूप

कृती - बटाटे उकडून ते पुरणयंत्रातून वाटून घ्यावेत. या प्रमाणे वाटलेला गोळा दोन वाट्या, साखर दोन वाट्या, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे असे सर्व एकत्र शिजत ठेवावे. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे. नंतर खाली उतरवून चांगले घोटावे. त्यात वेलदोडा पूड घालावी. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर गोळा गोळा लाटावा व वड्या पाडाव्यात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naivaidya Bappacha: Batatyachya Vadya