नैवैद्य बाप्पाचा:  लिंबाची रसाची डाळ

सुप्रिया खासनीस
Thursday, 20 August 2020

साहित्य - दोन वाट्या चण्याची डाळ, सात-आट ओल्या मिरच्या, मीठ, साखर, कोथिंबीर, कढीपत्ता, दोन चांगली लिंबे, फोडणीचे साहित्य

साहित्य - दोन वाट्या चण्याची डाळ, सात-आट ओल्या मिरच्या, मीठ, साखर, कोथिंबीर, कढीपत्ता, दोन चांगली लिंबे, फोडणीचे साहित्य

कृती - प्रथम डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर ती रोळीत उपसून घ्यावी. मिरच्या घालून ती जाडसर वाटावी. नंतर तेल घेऊन त्यात फोडणीचे साहित्य व कढीपत्ता घालून फोडणी करावी व गार करावी. वाटलेल्या डाळीत साखर मीठ व दोन लिंबांचा रस घालून एकत्र कालवावे. नंतर गार झालेली फोडणी घालावी व त्यावर कोथिंबीर घालून एकसारखी करावी. ही खिरापत गणपती विसर्जनाच्या दिवशी विशेष केली जाते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naivaidya Bappacha: Limbachi rasachi dal