नैवैद्य बाप्पाचा: मैद्याची खारी पुरी

सुप्रिया खासनीस
Thursday, 20 August 2020

साहित्य - अडीच वाट्या मैदा, एक चमचा जाडसर मिरेपूड, दोन चमचे जिरे पूड, चवीपुरते मीठ, थोडी हळद, तेल

 

साहित्य - अडीच वाट्या मैदा, एक चमचा जाडसर मिरेपूड, दोन चमचे जिरे पूड, चवीपुरते मीठ, थोडी हळद, तेल

कृती- मैदा, मिरपूड, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ व हळद घालून अर्धी वाटी तेल घालून पाण्याने भिजवून ठेवावे. नंतर एक तासाने चांगले मळावे. मग साधारण लहान आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्या पातळ लाटाव्यात. त्यावर सुरीने टोचे पाडून अर्धा पाऊण तास सुकत ठेवाव्यात. नंतर पुऱ्या तेलात गुलाबी रंगावर तळाव्यात. खुसखुशीत होतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naivaidya Bappacha: Maidyachi Khari puri