‘एक गाव एक गणपती’ च्या 48 वर्ष परंपरेच कोकणातील उर्सें गाव

kasa villege 48 years tradition of one village one ganesh activity in sindhudurg
kasa villege 48 years tradition of one village one ganesh activity in sindhudurg

कासा : डहाणू तालुक्‍यातील कुणबी आणि आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या ‘उर्सें’ गावाने ‘एक गाव एक गणपती’ उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गेल्या ४८ वर्षांपासून उर्से गावातील सर्व एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक गौरी उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात. या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच हजारच्या आसपास आहे.

उर्से गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे. हाच आदर्श या गावाने जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन सर्व उत्सव साजरे करतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पहिल्यांदाच या वर्षी या कार्यक्रमास गावकऱ्यांनी स्थगिती दिली आहे. यंदा पाच दिवसांचा गणपती अडीच दिवस करण्यात आला असून अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

गावातील तरुणवर्ग एकत्र येऊन सजावटीसाठी टाकाऊ वस्तूपासून देखावे साकारतात. येथे बनविण्यात येणारे मखर इकोफ्रेंडली असते. यावर्षी अवकाश तारांगण तयार करून जात्यावर दळण दळणारी महिला मास्क बांधून आपले काम करीत आहे, असा देखावा साकारण्यात आलेला आहे.

अनोखी परंपरा

या गावाची परंपरा अशी की गणपती व गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो व भगवंतावरील भक्ती म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. यातून उरलेले पैसे गरजवंत शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जातात. पुढील वर्षी याच पैशातून हे सण साजरे करतात. दरवर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात. या ठिकाणी जुगार व नशा यांना पूर्णपणे विरोध असतो व असे करणाऱ्याकडून दंड आकारला जातो अशा प्रतिक्रिया उर्से गावकरी व्यक्त करतात.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com