esakal | स्वप्नालीच्या स्वप्नांना गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली दिशा
sakal

बोलून बातमी शोधा

story of swapnali who girl study in forest due to internet but various organisations help her in kokan

केंद्र सरकारच्या भारत नेटवर्क प्रकल्पांतर्गत दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिच्या घरापर्यंत इंटरनेट जोडणी देण्यात आली.

स्वप्नालीच्या स्वप्नांना गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली दिशा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : घरात इंटरनेटची रेंज मिळत नसल्याने उंच डोंगरावर जाऊन मोबाईलच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या स्वप्नालीचा वनवास गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी संपला. केंद्र सरकारच्या भारत नेटवर्क प्रकल्पांतर्गत दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिच्या घरापर्यंत इंटरनेट जोडणी देण्यात आली. दरम्यान, ‘आम्ही कणकवलीकर’ने स्वप्नालीला लॅपटॉप देऊन यात खारीचा वाटा उचलला.

हेही वाचा - आली गवर आली, सोन पावली आली कोकणात दोन दिवसीय गौरींचे आगमन...

कणकवली तालुक्‍यातील दारिस्ते गावातील स्वप्नाली लॉकडाउन कालावधीतच गावीच अडकली होती. तरीही तिने मोबाईलच्या साहाय्याने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले होते. त्यासाठी तिला घरापासून दोन किलोमीटर लांब असणाऱ्या डोंगरमाथ्यावर जावे लागत होते. उन्हाळ्यात झाडाखाली तर पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरमाथ्यावर झोपडी बांधून तिचा अभ्यास सुरू होता. ही बाब ‘आम्ही कणकवलीकर’च्या सदस्यांना कळताच प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत तिला लॅपटॉप मिळवून देण्याची व्यवस्था केली.

हेही वाचा - वाढदिवशी झालेल्या भेटीतूनच झाला घात..! कुठे घडली घटना ?

भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनीही पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. स्वप्नालीच्या खडतर शैक्षणिक वाटचालीची दखल केंद्र सरकारने घेतल्यानंतर तातडीने कार्यवाही सुरू झाली. यात मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी सीएससी ई-गव्हर्नन्स चे सीईओ डॉ. दिनेश त्यागी, राज्य समन्वयक वैभव देशपांडे, कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित यांनी तातडीने दारिस्ते गावात इंटरनेट जोडणीची व्यवस्था सुरू केली. यात सर्वप्रथम दारिस्ते ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी जोडण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते स्वप्नाली सुतार हिच्या घरापर्यंत केबल टाकून इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी देण्यात आली. 

संपादन - स्नेहल कदम