esakal | नदीपात्रात गणेशविसर्जन केल्यास फौजदारी गुन्हा; प्रशासनाची तंबी
sakal

बोलून बातमी शोधा

Appeal for immersion at the nearest Ganesh idol collection center in Sangamner taluka

घरीच आरती करून गणेशमूर्ती नजीकच्या संकलन केंद्रावर विसर्जनासाठी देण्याची विनंतीवजा सूचना संगमनेरमध्ये प्रशासनाने शहरातील सुजाण नागरिक व गणेश मंडळांना सोशल मीडियाद्वारे केली आहे.

नदीपात्रात गणेशविसर्जन केल्यास फौजदारी गुन्हा; प्रशासनाची तंबी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : घरीच आरती करून गणेशमूर्ती नजीकच्या संकलन केंद्रावर विसर्जनासाठी देण्याची विनंतीवजा सूचना संगमनेरमध्ये प्रशासनाने शहरातील सुजाण नागरिक व गणेश मंडळांना सोशल मीडियाद्वारे केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरात 15 ठिकाणी मूर्तिसंकलन केंद्रे तयार केली आहेत. प्रतिष्ठापनेपासूनच गणेशविसर्जनाची तयारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आली आहे.

प्रवरा नदीला पुराचे पाणी वाढले असल्याने, विसर्जनाच्या वेळी उत्साहाच्या भरात अपघात होण्याची शक्‍यता असते. अप्रिय गोष्टी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी पाच कृत्रिम हौदही बनविण्यात आले आहेत. काही सामाजिक संस्थांनीही कृत्रिम फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे. संकलित गणेशमूर्ती विधिवत विसर्जित करण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली आहे. प्रवरा नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. 

कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नागरिकाला थेट नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जित करायला परवानगी दिलेली नाही. असा प्रयत्न केल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची तंबी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image