Ganeshotsav 2022: गणपती अथर्वशीर्ष पठणाचे 'हे' नियम माहित्येत?

अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. हजारो भाविक ते दररोज म्हणत असतात. काहींचा तर नेमच असतो. मात्र, गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम पाळावे लागतात. जाणून घ्या.
Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022esakal

गणेश चतुर्थीपासून १० दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो. गणेशाच्या आराधना उपासनेसाठी कोणतीही तिथी असो, त्या दिवशी गणपतीचे विविध श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हटल्या जातात. यापैकी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते ते अथर्वशीर्ष. अनेक गणेशभक्त दररोज, प्रत्येक चतुर्थीला, संकष्ट चतुर्थीला, गणेश चतुर्थीला, गणेश जयंतीला अशा अनेकविध वेळेला ते पठण करत असतात.

अथर्वशीर्षची माहिती

अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो.

अथर्वशीर्ष म्हणताना पाळावयाचे नियम

  • उच्चार अगदी स्पष्ट असावे.

  • अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

  • अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.

  • जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः ।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.

  • अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.

  • अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

  • अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे

  • अथर्वशीर्ष पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.

  • अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.

  • दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

  • अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्‍यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.

  • अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.

  • पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com