
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महाराष्ट्रात जल्लोष सुरू झाला आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी सजावटीच्या वस्तू आणि गाण्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.
सोशल मिडियावर बाप्पासोबतचे फोटो आणि रिल्स व्हायरल करण्यासाठी 'गजानना', 'देवा श्रीगणेशा' यांसारखी गाणी वापरून अधिक लाइक्स मिळवता येतील.
Tips for creating Ganesh Utsav Instagram Reels: "गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया...!" बाप्पांच्या स्वागतासाठी संपुर्ण महाराष्ट्रात आनंदात आणि जल्लोषात घरोघरी तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठा देखील सजावटीच्या वस्तू, गणेश मूर्ती, मिठाई यासारख्या अनेक गोष्टींनी सजल्या आहेत.
भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला "गणेश चतुर्थी" साजरी केली जाते. हिंदू धर्मात या चतुर्थीला खुप महत्व आहे. या दिवशी गणपतीची बाप्पांची मूर्ती घरी आणून मनोभावे पूजा केली जाते.