esakal | महाभारताचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र पद्मालय..बाप्पा भाविकांचे श्रद्धास्थान
sakal

बोलून बातमी शोधा

padmalaya ganesh tempal

एरंडोल गावापासून केवळ अकरा किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय देशभरात प्रसिध्द आहे. श्री गणेशाच्या साडेतीन पिठांपैकी एक हे श्री क्षेत्र आहे. गणपती मंदिर परिसराच्या चारही बाजूला घनदाट अरण्य असून विविध वन्य प्राण्यांचा संचार येथे नेहमी दिसत असतो. मंदिरासमोर भव्य तलाव असून तेथील विविध रंगाच्या कमळाच्या फुलांमुळे सौंदर्यात भर पडत असते.

महाभारताचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र पद्मालय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : देशभरात प्रसिध्द असलेल्या गणपती मंदिरापैकी एक महाभारत कालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपतीचे मंदिर. जळगाव जिल्ह्यातील एंरडोल तालुक्यात हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे एरंडोल तालुक्याची वेगळी ओळख देशभरात निर्माण झाली असून दररोज हजारो भाविक या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिराचा परिसर घनदाट जंगल, जवळ असलेल्या तलाव, तलावातील विविध प्रकारचे रंगबिरंगी कमळाचे फुल हे भाविकांना आकर्षीत करतात.
 
एरंडोल गावापासून केवळ अकरा किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय देशभरात प्रसिध्द आहे. श्री गणेशाच्या साडेतीन पिठांपैकी एक हे श्री क्षेत्र आहे. गणपती मंदिर परिसराच्या चारही बाजूला घनदाट अरण्य असून विविध वन्य प्राण्यांचा संचार येथे नेहमी दिसत असतो. मंदिरासमोर भव्य तलाव असून तेथील विविध रंगाच्या कमळाच्या फुलांमुळे सौंदर्यात भर पडत असते.

मंदिराला महाभारताचा इतिहास
महाभारताच्या काळात पांडव अज्ञातवासेत असतांना या ठिकाणी तलावात आंघोळीसाठी येत असत अशी काल्पनिक अख्यायिका आहे. तसेच पांडवकाळात भिम व बकासुराचे युद्ध झाल्याची काल्पनिक कथा आहे. बकासुराचा वध केल्यानंतर भिमाला तहान लागल्याने त्याने आपल्या मुठीचा जोरदास प्रहार खडकावर केल्‍याने त्या ठिकाणी खोल खड्डा पडला; त्यास भिम कुंड म्हणून ओळखले जाते. भिम कुंड परिसरात आजही भाताचा कण असल्याच्या पांढऱ्या खुणा आढळून येतात. एरंडोल शहरात असलेल्या पांडववाड्यातून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.

मंदिराची रचना हेमाडपंथी
मंदिर पुरातन असून मंदिराची संपूर्ण बांधकामाची रचना ही हेमाडपंथी आहे. मंदिरात डाव्या-उजव्या सोडेंचे गणपती आहे. मंदिरासमोर भव्य घंटा असून प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. मंदिरापासून सुमारे दोन ते तिन किलोमीटरच्या अंतरावरील घनदाट अरण्यात असलेल्या भिमकुंड आहे. श्री क्षेत्र पद्मालायाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास मंदिर परिसरात विकास होवून पर्यटक संख्येत वाढ होईल. पर्यायाने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल.

मंदिर परिसर निसर्गाने नटलेला
मंदिराला लागून तलाव असून मंदिराच्या सौंदर्य फुलवते. तर तलावातील विविध प्रकारचे व रंगाचे कमळाचे फुल भाविक व पर्यटनांसाठी आलेल्यांना आकर्षीत करत असते. पावसाळ्यात संपूर्ण जंगलात हिरवेगार वृक्षाची आकर्षक दृष्य दिसत असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद भाविकांना या श्री क्षेत्र पद्मालय मंदिरात येणाऱ्यांना मिळतो.

चतुर्थीला भाविकांची गर्दी
पद्मालय मंदिर प्रसिद्ध असून गणेश भक्तामध्ये श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अंगारकी चतुर्थी तसेच संकष्ट चतुर्थीला न चुकता गणपतीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. तसेच नवस फेडण्यासाठी देखील महिला वर्गासह विविध कार्यक्रम पद्मालय क्षेत्रात होत असतात. गणेश उत्सवात तर पद्मालय मंदिरात तर भाविकांची प्रचंड गर्दी असते. मंदिर संस्थानाकडून देखील भाविकांसाठी चांगल्या सुविधा येथे करण्यात आले आहे.

( संबंधित लेख याआधी प्रसिद्ध झाला होता. गणेशोत्सवानिमित्त हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत)

go to top