
पुणे : गणेशोत्सवासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बससेवेचे नियोजन केले आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात टप्प्याटप्प्याने ७८८ अतिरिक्त बसगाड्या धावणार आहेत. ही बससेवा रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुणे व उपनगरांतून गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही. मात्र, याअतिरिक्त बसगाड्यांना विशेष दर्जा दिला असल्याने दुपारच्या सत्रानंतर या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना १० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.