
pune ganeshotsav police bandobast
पुणे - गणेशोत्सवाची सांगता सहा सप्टेंबर रोजी भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या या मिरवणुकीसाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त तैनात केला असून, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.