esakal | नैवैद्य बाप्पाचा: चीज- स्वीट कॉर्न मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

Cheese_Corn_Modak

साहित्य:

सारणासाठी - दोन कप स्वीट काॅर्नचे दाणे, २ चीज क्यूब (किसून) १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, ३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरुन) १ टेबलस्पून लिंबू रस, १ टेबलस्पून पुदिना पाने (बारीक चिरुन) १ टेबलस्पून बटर, मीठ चवीनुसार

नैवैद्य बाप्पाचा: चीज- स्वीट कॉर्न मोदक

sakal_logo
By
सुजाता नेरुरकर

साहित्य:

सारणासाठी - दोन कप स्वीट काॅर्नचे दाणे, २ चीज क्यूब (किसून) १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, ३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरुन) १ टेबलस्पून लिंबू रस, १ टेबलस्पून पुदिना पाने (बारीक चिरुन) १ टेबलस्पून बटर, मीठ चवीनुसार

पारीसाठी - एक कप मैदा, १ कप गव्हाचे पीठ, १ टेबलस्पून गरम तेल, अर्धा टीस्पून मिरे पावडर, मीठ चवीनुसार, १ चिमट खायचा सोडा, तळण्यासाठी तेल

कृती - मैदा, गव्हाचे पीठ, तेलाचे मोहन, मिरे पावडर, मीठ व खायचा सोडा मिक्स करुन थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे व १० -१५ मिनिटांनी त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. स्वीट काॅर्नचे दाणे थोडे शिजवून घ्यावेत व थोडेसे ठेचून घ्यावे. एका कढईमध्ये बटर घालून आले-लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे घालून परतून घ्यावे. त्यामध्ये ठेचलेले काॅर्नचे दाणे, लिंबू रस, पुदिना पाने, मीठ घालून थोडे परतून घेऊन त्यामध्ये किसलेले चीज मिक्स केल्यावर झाले सारण तयार.

पीठाच्या छोट्या गोळ्याची पुरी लाटून त्यामध्ये एक चमचा मिश्रण भरुन पुरी बंद करावी व हवा तसा पुरीला आकार द्यावा व तळून घ्यावे.

go to top