esakal | सावलीत गणेशोत्सवानिमित्त यंदा आरोग्य महोत्सवाची संकल्पना
sakal

बोलून बातमी शोधा

सावलीत गणेशोत्सवानिमित्त यंदा आरोग्य महोत्सवाची संकल्पना

जगावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले असून यातून मार्ग निघावा यासाठी अनेकजण धडपडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अजिंक्य मंडळाने उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास पात्र आहे. आज कोरोना महामारीला रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

सावलीत गणेशोत्सवानिमित्त यंदा आरोग्य महोत्सवाची संकल्पना

sakal_logo
By
विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : कोरोना महामारीमध्ये होणारा गणेशोत्सव आरोग्य महोत्सव म्हणून साजरा करणाऱ्या सावली येथील अजिंक्‍य नेहरू युवा मंडळाचा उपक्रम तालुक्‍यासह जिल्ह्यातील प्रत्येक मंडळाला आदर्शवत आहे. अजिंक्‍य मंडळाने राबविलेला हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक मंडळाने राबवावा, असे आवाहन मेढा पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पाटील यांनी केले.
 
गणेशोत्सवानिमित्त तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी तालुक्‍यातील मंडळांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सावली येथे गणेशोत्सवानिमित्त अजिंक्‍य नेहरू युवा मंडळाने बालाजी ब्लॅड बॅंकेच्या सहकार्याने घेतलेल्या रक्तदान शिबिरप्रसंगी पाटील बोलत होते.

दुर्वाचे अस्तित्व धोक्यात; जाणून घ्या नेमकं कारण

यावेळी पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे, सरपंच नंदाताई जुनघरे, उपसरपंच दुर्योधन जुनघरे, माजी उपसरपंच वसंतराव म्हस्कर, सदस्य ज्ञानदेव जुनघरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सपकाळ, पोलिस पाटील संजय कांबळे, अजिंक्‍य मंडळाचे माजी अध्यक्ष बाबूराव जुनघरे, पांडुरंग म्हस्कर, एकनाथ जुनघरे, दिलीप म्हस्कर, काळेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जुनघरे, ब्लॅड बॅंकेचे जनसंपर्क अधिकारी अमर जाधव उपस्थित होते. 

जागतिक वारसास्थळी फुलांचा नजराणा यंदा होणार कैद? 

संतोष चामे म्हणाले, जगावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले असून यातून मार्ग निघावा यासाठी अनेकजण धडपडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अजिंक्य मंडळाने उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास पात्र आहे. आज कोरोना महामारीला रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव ओळखून गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात 55 दात्यांनी रक्तदान केले. मंडळाचे अध्यक्ष नामदेव जुनघरे यांनी प्रास्ताविक केले. शामराव जुनघरे यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे सचिव विश्वासराव जुनघरे यांनी स्वागत केले. सुनील म्हस्कर यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

go to top