Ganpati Visarjan Rally : विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करणार! पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांची ग्वाही

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मुख्य विसर्जन मार्गावरील बेलबाग चौकातून मानाचे गणपती दुपारी १२. ३० पूर्वी तर लोकमान्य टिळक चौकातून सायंकाळी ४ पर्यंत रवाना होतील.
pune ganpati visarjan
pune ganpati visarjansakal
Updated on

पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मुख्य विसर्जन मार्गावरील बेलबाग चौकातून मानाचे गणपती दुपारी १२. ३० पूर्वी तर लोकमान्य टिळक चौकातून सायंकाळी ४ पर्यंत रवाना होतील, अशी ग्वाही मानाच्या गणपती मंडळांनी शुक्रवारी दिली. सर्व गणेश मंडळांच्या सहकार्यातून मुख्य विसर्जन मिरवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान ३ तास लवकर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com