पुढच्या वर्षी लवकर या! पारंपरिक वाद्यांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाला निरोप; कृष्णातिरी भाविकांची अलोट गर्दी

सांगलीच्या गणपती पंचायतनच्या श्रींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी केले जाते.
Ganapati Panchayatan Sansthan Sangli
Ganapati Panchayatan Sansthan Sangliesakal
Summary

संस्थानच्या श्रींची मिरवणूक शाही लवाजम्यासह सरकारी घाटावर आली. त्यावेळी श्रींना निरोप देण्यासाठी हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीने घाट फुलून गेला होता.

सांगली : श्री गणपती पंचायतन संस्थानच्या (Ganapati Panchayatan Sansthan Sangli) गणरायाला काल संस्थानच्या परंपरेनुसार पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणुकीने उत्साहात निरोप (Ganpati Visarjan 2023) देण्यात आला. संस्थानच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी सांगलीसह पंचक्रोशीतील हजारो गणेश भक्तांनी कृष्णातिरी उपस्थिती दर्शवली होती.

Ganapati Panchayatan Sansthan Sangli
चौसोपी वाड्यात तब्बल 350 वर्षांची गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा; बाबा जोशींना दृष्टांत झाला अन् त्यांनी थेट 'हे' गाव गाठलं

सांगलीच्या गणपती पंचायतनच्या श्रींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी केले जाते. राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली जाते. पाच दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. काल (शनिवार) पाचव्या दिवशी दरबार हॉलमध्ये दुपारी तीन वाजता संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, पौर्णिमाराजे पटवर्धन, मधुवंतीराजे पटवर्धन, जनसुराज्यचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष नितीन चौगुले, चंद्रहार पाटील आणि पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर प्रमुख उपस्थित होते. यानंतर श्रींची मूर्ती सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आली आणि मिरवणुकीस प्रारंभ झाला.

Ganapati Panchayatan Sansthan Sangli
Konkan Ganeshotsav : खासदार राऊतांच्या गणपतीसमोर तब्बल 180 भजनी मंडळांची मनोभावे सेवा; कोकणची लोककला पोहोचली सातासमुद्रापार

यंदाच्या मिरवणुकीत नाद प्रतिष्ठा, शिवतांडव आणि ओम रुद्र या तीन मंडळांचे ढोल-ताशा आणि ध्वज पथक सहभागी झाले होते. तीनही पथकांत युवक आणि युवती पारंपरिक वेषात फेटे, भगवे तसेच केशरी जाकीट परिधान केलेल्या पथकांनी हातात भगवे ध्वज घेऊन धरलेला ठेका नागरिकांचे आकर्षण ठरला. यामध्ये अजमेर येथील सत्यनारायण ढोलवाला यांचे पथकही सहभागी झाले होते. राजवाडा चौक, पटेल चौक मार्गे गणपती पेठेतून ही मिरवणूक पुढे जात होती.

Ganapati Panchayatan Sansthan Sangli
Konkan Ganeshotsav : 'त्या' सोनेरी दिवसांच्या उरल्या फक्त आठवणी! आताच्या झगमगाटातही 'तिलारी'च्या स्मृती तेजस्वी

यावेळी रथातील श्रींच्या मूर्तीवर भाविकांकडून पेढे उधळण्यात येत होते. पटेल चौकात साथीदार ग्रुपच्यावतीने क्रेनने भला मोठा पुष्पहार श्रींच्या मूर्तीला घालण्यात आला. तेथेच सजवलेले घोडे त्यावर पारंपरिक वेषातील तसेच छत्रपती आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक वेशभूषेतील बालके घोड्यावर स्वार होऊन या मिरवणुकीत सहभागी झाली. सांगली आणि पंचक्रोशीतील गावातील हजारो गणेश भक्त मिरवणूक पाहण्यास उपस्थित होते.

Ganapati Panchayatan Sansthan Sangli
सांगलीतील चिंचोलीत गणेशमूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू; गणपती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, अंनिसनं केलं 'हे' आव्हान

आंबी परिवाराचा मान

संस्थानच्या श्रींची मिरवणूक शाही लवाजम्यासह सरकारी घाटावर आली. त्यावेळी श्रींना निरोप देण्यासाठी हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीने घाट फुलून गेला होता. संस्थानच्या श्रींचे विसर्जन कृष्णा नदीत करण्यासाठी नाव सजवण्यात येते. त्यावर विद्युत रोषणाईही केलेली असते. या नावेतून श्रींची मूर्ती नदीत नेऊन विसर्जित केली जाते. हा मान आंबी परिवाराला असतो. या परिवारातील विश्‍वेश आंबी, गजानन आंबी, विजय आंबी, तुषार आंबी, महादेव आंबी यांनी मिरवणूक घाटावर आल्यावर विजयसिंहराजेंचा सत्कार केला. त्यानंतर श्रींची मूर्ती नावेतून नेऊन कृष्णा नदीपात्रात नेऊन आरती करून विसर्जित केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com