गणेशोत्सव2019 : दिमाखदार मिरवणुकांनी गणपती बाप्पाला निरोप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला झाली. दिमाखदार विसर्जन मिरवणुका काढून गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकरच येण्याचे निमंत्रण देत गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या विसर्जनाच्या दिवसातील राज्यातील क्षणचित्रे.

गणेशोत्सव2019 : पुणे - चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला झाली. दिमाखदार विसर्जन मिरवणुका काढून गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकरच येण्याचे निमंत्रण देत गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या विसर्जनाच्या दिवसातील राज्यातील क्षणचित्रे.

मुंबई
    सात हजार ६२७ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन 
    राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर दास शक्तिदास गिरगाव चौपाटीवर 
    लालबागच्या राजाचे २२ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन

सातारा
    ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग
    महिला व मुलींची झांजपथके ठरली लक्षवेधी
    पारंपारिक वेश आणि फेटेधारी युवकांची मोठी गर्दी
    रंगबेरंगी कागदांची उधळण करणाऱ्या फटाक्‍यांना प्राधन्य

कोल्हापूर
    ढोल-ताशांचा गजर
    भरपावसात मिरवणूक
    पारंपरिक वाद्यांच्या गजरात गजाननाला निरोप
    उच्च आवाजाच्या ध्वनियंत्रणांना पोलिसांकडून मज्जाव
    पोलंडच्या पर्यटकांनी धरला फेर

मिरज-सांगली
    मिरजेत विसर्जन मिरवणुकीत पंजाबी ढोल पथकांचा दणदणाट
    मराठमोळ्या वेशातील ढोल पथकांचा सहभाग

रत्नागिरी-सिंधुदुर्ग
    मंडणगडमध्ये ‘कुंभीभवनच्या राजा’ची २१ किलोमीटर मिरवणूक

बेळगाव
    ध्वनियंत्रणेवरून पडून एकाचा मृत्यू
    खानापूर तालुक्‍यातील बेटगिरीत तलावात बुडून दोघांचा मृत्यू

मराठवाडा
    नांदेड जिल्हा ः पावसाच्या सरीतही गणेशभक्तांचा उत्साह
    महिलांसह युवतींचा सहभाग
    डीजेला फाटा देत पारंपरिक ढोल-ताशा वाद्याला मंडळांची पसंती
    परभणी जिल्हा : सिंधी गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीनंतर मार्गाची स्वच्छता
    परभणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात विसर्जनासाठी हौद 
    मिरवणुका रात्री १२ वाजेपर्यंत चालल्या
    हिंगोली जिल्हा :  साडेबाराशे गणेशमूर्तींचे विसर्जन
    बहुतांश ठिकाणी गुलालाऐवजी फुलांची उधळण
    जिल्ह्यात पाच तालुक्‍यांत दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

नाशिक
    ढोल-ताशा-लेझीमच्या निनादात थिरकली तरुणाई
    मैदानी खेळ,  चित्तथरारक कसरती
    एक लाख २९ हजार मूर्ती दान
    १०८ टन निर्माल्य संकलित

सोलापूर 
    यंदा प्रथमच पांरपरिक वाद्ये
    महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस प्रशासन, अग्निशामक व वैद्यकीय पथकांमध्ये दिसले समन्वय
    सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांनी दिला मदतीचा हात

खानदेश   
    भुसावळला मिरवणुकीत वाद; माजी नगरसेवकाच्या मुलावर चाकूहल्ला
    नंदुरबारमध्ये शांततेत विसर्जन
    मध्य प्रदेशातील पथकाची चित्तथरारक प्रात्यक्षिके
    पोलिस प्रशासनाशी वाद, प्रयास मंडळाचा ठिय्या
    धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून दीडशे टन निर्माल्य संकलन
    नदीपात्रात विसर्जनावर बंदी
    मेहरुण तलावावरील गणेशघाटाला यात्रेचे स्वरूप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Maharashtra