सांगली : मिरजेत कल्पक मूर्ती, पौराणिक संकल्पनांवर भर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

सांगली - गणेशोत्सवात यंदा उंच आणि कल्पक मूर्ती पहायला मिळत आहेत. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा देखाव्यांना फाटा दिला आहे. विविध रुपांतील उंच मूर्ती, महाप्रसाद आणि जोरदार मिरवणूक असे नियोजन आहे.

सांगली - गणेशोत्सवात यंदा उंच आणि कल्पक मूर्ती पहायला मिळत आहेत. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा देखाव्यांना फाटा दिला आहे. विविध रुपांतील उंच मूर्ती, महाप्रसाद आणि जोरदार मिरवणूक असे नियोजन आहे.  

शनिवार पेठ, संभा तालीम चौक, गांधी चौक, शिवाजीनगर, हिंदमाता चौक, जिलेबी चौक येथील मंडळांनी नेत्रदीपक रोषणाई केली आहे. सुभाषनगर रस्त्यावर कलावती मंदिराजवळील स्वराज्य मंडळाचा गणेश समुद्रविहार करत आहे. कनवाडकर हौदावरील शिवगर्जना मंडळाने हनुमानाच्या खांद्यावर बसून बाण मारणारा गणेश दाखवला आहे. गोठण गल्लीतील रणझुंजार मंडळाचा गणपती बालमजुरी थांबवण्याचा संदेश देत आहे. गोंधळी गल्ली मंडळाने नारळातील गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. बसवेश्वर मंडळाचा बैलावर बसलेला गणपती नागरिकांचे आकर्षण ठरला आहे.

मिरजेत पाहण्याजोगे
स्वराज्य मंडळाचा समुद्रविहार करणारा गणपती, माधव चित्रमंदिराजवळ श्रीराम मंडळाचा समुद्रमंथन करणारा व गोंधळी गल्ली मंडळाचा नारळातील गणपती, गोठण गल्लीतील रणझुंजार मंडळाचा बालमजुरी थांबवणारा गणपती, गोठण गल्ली मंडळाचा बाळकृष्ण रुपातील गणेश, मगदूम गल्लीतील शिवरत्न मंडळाचा वाळूपासून बनवलेला गणपती, धनगर गल्लीत अहिल्यादेवी मंडळाचा शेषावर स्वार गणेश, गांधी चौकाजवळील कैकाडी गल्लीतील कासवावर आरूढ गणेश, वाळवे गल्लीत मंगलमूर्ती मंडळाचा बळीराजा रुपातील श्री, विजापूरवेशीतील मंडळाची देखणी मूर्ती, कोकणे गल्लीत मोरांवर स्वार गणेश, कुंभारखणीत नंदीवर स्वार सहकुटुंब गणेश, मंगळवार पेठेत लालबागच्या राजाची प्रतिकृती, गांधी उद्यानातील पार्वती व बालगणेशाची देखणी मूर्ती

रेल्वेचा सर्वधर्मीय गणेशोत्सव
रेल्वेतील सर्वधर्मीय कर्मचारी सेक्‍शन इंजिनिअर कार्यालयात गणपती बसवतात. भजन-कीर्तन आणि महाप्रसाद करतात. हिंदू-मुस्लिमांसह ख्रिश्‍चन धर्मीयांनाही आरतीचा मान असतो. या रेलपथ मंडळाने यंदा बाविसाव्या वर्षी नेत्रदीपक रोषणाई केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival in Miraj Sangli