गणेशोत्सव2019 : दगडूशेठ ट्रस्टतर्फे विसर्जन मिरवणुकीत मानवसेवा रथ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

सांगली व कोल्हापूरमधील सर्वच नदीकाठच्या शहरांना पूरस्थितीमुळे इशारा दिलेला आहे. यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने मानाचे गणपती, गणेश मंडळे आणि लोकसहभागातून मुळा-मुठा जलसंजीवनी अभियान राबविण्याचे ठरविले आहे. मुठा नदीची वहनक्षमता एक लाख क्‍युसेक आहे. परंतु, नुकतेच 45 हजार क्‍युसेक पाणी सोडतानाही अनेक अडथळे आले आणि घरे व झोपड्या बाधित झाले. ही स्थिती पाहून पुणेकरांनीही वेळीच सावध व्हायला हवे. मुठा नदीमध्ये सांडपाणी, अस्थी, रक्षा, निर्माल्य, कचरा टाकून प्रदूषित केले जाते.

गणेशोत्सव2019 : पुणे - सांगली-कोल्हापूर पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा जय गणेश मुळा-मुठा जलसंजीवनी अभियानाचा संदेश देणारा "मानवसेवा रथ' गणेश विसर्जन मिरवणुकीत असणार आहे.

सांगली व कोल्हापूरमधील सर्वच नदीकाठच्या शहरांना पूरस्थितीमुळे इशारा दिलेला आहे. यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने मानाचे गणपती, गणेश मंडळे आणि लोकसहभागातून मुळा-मुठा जलसंजीवनी अभियान राबविण्याचे ठरविले आहे. मुठा नदीची वहनक्षमता एक लाख क्‍युसेक आहे. परंतु, नुकतेच 45 हजार क्‍युसेक पाणी सोडतानाही अनेक अडथळे आले आणि घरे व झोपड्या बाधित झाले. ही स्थिती पाहून पुणेकरांनीही वेळीच सावध व्हायला हवे. मुठा नदीमध्ये सांडपाणी, अस्थी, रक्षा, निर्माल्य, कचरा टाकून प्रदूषित केले जाते. तिची वहनक्षमता घटत चालली आहे. या गांभीर्याने लक्ष वेधणे हा त्यामागे उद्देश आहे. मुळा आणि मुठा नद्या शुद्ध व्हाव्यात, प्रवाही क्षमता पूर्णपणे गाठली जावी, हा या अभियानाचा संकल्प आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

मानवसेवा रथावर नदीसंवर्धन रक्षणाची घोषवाक्‍ये असणार आहेत. चार वर्षांपूर्वी मानाचे गणपती, दगडूशेठ गणपतीसह प्रमुख मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन नदीकाठी महापालिकेने बांधलेल्या हौदात केले. त्यानंतरही नदीतील प्रदूषण घालविणे, नदीसुधारणा यासाठी पालिका प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही. यापुढे नदीसुधारणेसाठी लोकसहभागातून प्रशासनावर दबाव ठेवला जाणार आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Dagdusheth Trust Manavseva Rath