गणेशोत्सव2019 : हिऱ्यामोत्यांच्या पावलांनी घरोघरी आल्या गौरी... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

सोनपावलांनी माहेरवासाला येणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठा अर्थात गौराईंचे आज घरोघरी आगमन झाले. गौराई आली हिऱ्यामोत्यांच्या पावलांनी, गौराई आली सुख-शांतीच्या पावलांनी, अशा सुरात त्यांचे स्वागत करण्यात आले. 

पुणे - सोनपावलांनी माहेरवासाला येणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठा अर्थात गौराईंचे आज घरोघरी आगमन झाले. गौराई आली हिऱ्यामोत्यांच्या पावलांनी, गौराई आली सुख-शांतीच्या पावलांनी, अशा सुरात त्यांचे स्वागत करण्यात आले. 

गणरायाचे आगमन झाल्यानंतर गौराईच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागतात. त्यासाठी महिलांची पूर्वतयारी सुरू होते. फळे, फुले आणि हारांच्या सजावटीसाठी खरेदी केली जाते. गौरींच्या आगमनाने आज या तयारीला पूर्णत्व मिळाले. अ

नेक ठिकाणी दुपारच्या सुमारास गौरींची मुखवटे मिरवून काढून स्थापना करण्यात आली. त्यासाठी घरे, सोसायट्यांच्या परिसरात चित्तवेधक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अनेक घरांमध्ये गणरायाप्रमाणेच गौरींसाठीही मोठी आरास आणि वेगवेगळ्या वस्तूंद्वारे आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. उद्या गौरी पूजनाबरोबर साग्रसंगीत भोजन आणि शनिवारी विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी घरोघरी हळदी-कुंकवाचे आयोजन करण्यात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Ganpati in pune