गणेशोत्सव2019 : गौरींच्या आगमनासोबत साकारली देशभक्तिपर भारतमातेची आरास!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

विद्युतनगर भागातील संत कुटुंबीय सुमारे वीस वर्षांपासून गौरींची स्थापना करीत आहे. दरवर्षी गौरी गणपतीच्या स्थापनसोबतच विविध आरास साकारली जाते. यंदा संत कुटुंबीयांकडून भारतमातेची आरास साकारण्यात आली असून, आरसमधून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

गणेशोत्सव2019 : जळगाव - विद्युतनगर भागातील संत कुटुंबीय सुमारे वीस वर्षांपासून गौरींची स्थापना करीत आहे. दरवर्षी गौरी गणपतीच्या स्थापनसोबतच विविध आरास साकारली जाते. यंदा संत कुटुंबीयांकडून भारतमातेची आरास साकारण्यात आली असून, आरसमधून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात शुक्‍ल पक्षात गौराईंचा सण उत्साहपूर्ण व भक्‍तिमय वातावरणात साजरा केला जातो. शहरातील चंद्रकांत संत कुटुंबीय गेल्या वीस वर्षांपासून गौरींची स्थापना करीत आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी विविध आरास साकारल्या जात असतात. यंदा त्यांनी भारतमातेची देशभक्तिपर आरास साकारली आहे. ही आरास प्रेरणा संत, हर्षल, अर्चना, समृद्धी व सार्थक यांनी साकारली आहे.

गौराईंच्या तीन दिवस घरात चैतन्याचे वातावरण असते. यात पहिल्या दिवशी गौराईंची स्थापना, दुसऱ्या दिवशी महानैवेद्य व हळदी- कुंकवाचा कार्यक्रम, तर तिसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून विधिवत गौराईंचे विसर्जन केले जात असून, हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात असतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Gauri Ganpati Bharatmata Decoration