गणेशोत्सव2019 : घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

स्पर्धेचे नियम व अटी 

  • सजावटीचे फोटो दै. सकाळच्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक यासह आणून द्यावे. 
  • सजावटीच्या फोटोंमधून निवडक छायाचित्रे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध केली जातील. यातूनच विजेतेही निवडण्यात येतील. 
  • शहरातील काही ठिकाणी स्पर्धेचे परीक्षक भेट देऊन, त्यातून विजेते काढतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 
  • स्पर्धेत सहभागासाठी मधुरांगण सभासदांना विनामूल्य, तर इतरांसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येईल. 
  • सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला १५० रुपये किमतीची भेटवस्तू देण्यात येईल.

गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या आगमनाची घरोघरी तयारी होत असताना दैनिक सकाळ मधुरांगण आणि सावजी मसाले यांच्यातर्फे  घराघरांतील श्रीगणेश गणपती आरास स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवादरम्यान २ ते १२ सप्टेंबर २०१९ या काळात घरोघरी तयार केलेल्या गणेश सजावटीसाठी स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी धरमपेठ येथील मूनलाइट स्टुडिओचे विशेष सहकार्य लाभले आहे.

गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा हळवा कोपरा. अतिशय श्रद्धा आणि मोठ्या भक्‍तिभावाने हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. बाप्पांच्या आगमनापूर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येक जण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. घरगुती गणपतींना होणारी सजावट लक्षात घेता सकाळ मधुरांगणतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो दैनिक सकाळ शहर कार्यालय, २७४/१, वर्धा हाउस, २-३ मजला, क्रिम्स हॉस्पिटलच्या बाजूला, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, नागपूर येथे आणून द्यायचा आहे. याशिवाय मधुरांगण समन्वयिका हर्षाली दगडे (व्हॉट्‌सॲप क्रमांक ९५२७००४४५६) यांच्याकडे नाव, पत्ता अशा माहितीसह पाठवता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Domestic Ganesh Festival Decoration Contest by Madhurangan