असे आहे दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 August 2019

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान, पुणे हे मंदिर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. प्रत्येक वर्षी पुण्याशिवाय हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. 2017 या वर्षी मंदिर संस्थानने 125 वर्ष पुर्ण केली. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती आहे.

या संस्थानाला दरवर्षी लाखो रुपये आणि सोन्याचे, चांदीचे दागिने भाविक दान करत असतात. संस्थेला मिळालेले दान अनेक सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणले जाते. 2003 साली दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानने दिड कोटी रुपये इतके दान केलेल्या पैशातून कोंढवा (पुणे) येथे 'पिताश्री' हे वृध्दाश्रम सुरु केले. या वृध्दाश्रमाच्या इमारतीतच 40 निराधार मुलांना निवास आणि शिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. इतर सुविधांमध्ये या संस्थानच्या वतीने पुणे जिल्ह्यातील गरीब आणि आदिवासी वस्तींसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

संस्थानच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव वा इतर सणांना केला जाणारा देखावा आणि रोषणाई नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on dagdusheth Ganpati in pune