esakal | गणेशोत्सव2019 : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गौरी-गणपतींचे विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

gauri-ganpati-visarjan

गणेशोत्सव2019 : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गौरी-गणपतींचे विसर्जन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष करीत घरगुती गणपतींचे आणि गौरीचे विसर्जन नागरिकांनी उत्साहात केले. शहरातील अनेक नागरिक घरगुती गणपती बसवितात. काही जण दीड, पाच व सात दिवसांनी त्यांचे विसर्जन करतात. गौरींबरोबरच गणपतींनादेखील शनिवारी निरोप देण्यात आला.

मुळा-मुठा नदीकाठावरील हौद तसेच सोसायट्यांमधील हौदात विसर्जनाची सोय करण्यात आली होती. दरम्यान, गणेशाच्या विसर्जनानंतर नागरिक सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे चित्र होते.