Video : अशी झाली मानाच्या पहिला कसबा गणपतीची प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

मानाच्या पहिला असलेल्या कसबा या गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्यामध्ये प्रभात बॅण्ड, श्रीराम आणि संघर्ष ढोल ताशा पथकाने वादन केले.

पुणे : मानाच्या पहिला असलेल्या कसबा या गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्यामध्ये प्रभात बॅण्ड, श्रीराम आणि संघर्ष ढोल ताशा पथकाने वादन केले. सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व क्रियायोगाचे अभ्यासक श्री राम यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना झाली. 

राम यांच्या हस्ते एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, डॉ. कमलेश बोकील, कुस्तीपटू राहुल आवारे, वेदमूर्ती गोपाळशास्त्री जोशी, उद्योगपती विशाल चोरडिया आणि गायक पं. संजीव अभ्यंकर यांना "कसबा गणपती पुरस्कारा'ने सन्मानित केले. "भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कारा'ने निवृत्त न्यायाधीश ऍड. दिलीप कर्णिक यांना सन्मानित करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ceremony of consecration of an Kasba Ganpati Idol