सिंधुदुर्ग : दीड दिवसांच्या लाडक्‍या गणरायाला निरोप 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

सावंतवाडी - येथील तालुक्‍यात दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तालुक्‍यात ठिकठिकाणी विसर्जन स्थळावर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत विसर्जन करण्यात आले. तालुक्‍यात काल (ता.2) गणपतींच्या मूर्तीची घराघरांत स्थापना करण्यात आली.

सावंतवाडी - येथील तालुक्‍यात दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तालुक्‍यात ठिकठिकाणी विसर्जन स्थळावर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत विसर्जन करण्यात आले. तालुक्‍यात काल (ता.2) गणपतींच्या मूर्तीची घराघरांत स्थापना करण्यात आली.

काही ठिकाणी एक दिवसांच्या आनंद उत्सवानंतर आज श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी लहान मुले गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणून पुढच्या वर्षी लवकर या अशी बाप्पांना हाक देत होते. यावेळी फटाके, आतषबाजी काही ठिकाणी करण्यात आली. आपल्या परिवारासह अनेकजण विसर्जनस्थळी दाखल झाले होते.

येथील शहरातील मोती तलावात श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणपतीची आरती एकत्रित म्हणून मूर्तींना पाण्यात विसर्जित करण्यात आले. ग्रामीण भागातही विविध ठिकाणच्या नदी, छोट्या ओहोळांमध्ये दीड दिवसांच्या गणपती गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यावेळी लहान मुले, वयोवृद्ध तरुण-तरुणी, महिला सर्वजण बाप्पांना निरोप देण्यासाठी दाखल झाले होते. येथील तालुक्‍यात सायंकाळी उशिरापर्यंत श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. 
 
देवगड - तालुक्‍यात ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणपतींचे आज थाटात विसर्जन झाले. "गणपती बाप्पा मोरया'चा गजर करीत भक्तांनी गणरायाला निरोप दिला.  तालुक्‍यात ठिकठिकाणी काल (ता.2) घरोघरी गणरायाचे उत्साही स्वागत करण्यात आले होते. पाऊस असूनही भक्तांचा उत्साह कायम होता. आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, याचे प्रमाण कमी होते. गणेश विसर्जन ठिकाणी मूर्ती आणून सामुदायिक आरती करुन गणरायांना निरोप देण्यात आला. उत्सवानिमित्त तालुक्‍यात चाकरमान्यांचे आगमन झाले आहे. 

कोलझर - बाप्पा मोरयाच्या गजरात येथे आज दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी सायंकाळी ठिकठिकाणी गणरायाची विधीवत उत्तर पूजा करण्यात आली. यानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान विसर्जनाला सुरवात झाली. यावेळी फटाक्‍यांची आतशबाजी तसेच बाप्पा मोरयाचा गजर करण्यात आला. उशिरापर्यंत हा सोहळा सुरू होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival idol Visarjan in Sindhudurg