गणेशमुर्ती रूजवणार बिया अन् फुलवणार परसबाग; स्वयंमच्या विशेष मुलांचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 August 2019

कोल्हापूर - गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. यंदाच्या उत्सवात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिने अनेक नवनवीन कल्पना पुढे आलेल्या पाहायला मिळणार आहेत.  येथील स्वयम्‌ विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनीही तब्बल १२० शाडूच्या मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींमध्ये फुलझाडांच्या बिया आहेत. तर यंदा मंडळाच्या मूर्ती एक्सजेंच करण्याच्या कल्पनेलाही मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. 

कोल्हापूर - गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. यंदाच्या उत्सवात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिने अनेक नवनवीन कल्पना पुढे आलेल्या पाहायला मिळणार आहेत.  येथील स्वयम्‌ विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनीही तब्बल १२० शाडूच्या मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींमध्ये फुलझाडांच्या बिया आहेत. तर यंदा मंडळाच्या मूर्ती एक्सजेंच करण्याच्या कल्पनेलाही मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी यंदाही आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढली असून, सार्वजनिक मंडळांनीही आता अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे. 

मूर्ती विसर्जनानंतर रुजणार फुलांच्या बिया
येथील स्वयम्‌ विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनीही यंदा तब्बल १२० शाडूच्या मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींमध्ये फुलझाडांच्या बिया आहेत. त्यामुळे या मूर्ती परसबागेत विसर्जित केल्यानंतर त्या ठिकाही काही दिवसांतच या बिया रुजणार आहेत आणि परसबागेत फुलं उमलणार आहेत. पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती संस्थेच्या कसबा बावडा रोडवरील न्यायालयाच्या पिछाडीस असलेल्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती अमरदीप पाटील यांनी दिली.

दरम्यान, गेल्या वर्षी एकट्या ‘निसर्गमित्र’ संस्थेकडून अडीच हजारांवर शाडूच्या मूर्ती गेल्या होत्या. यंदा किमान बारा हजारांवर शाडूच्या मूर्ती शहरात तयार होणार आहेत.  येथील चेतना विकास मंदिर संस्थेकडे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढत असल्याने चेतना शाळेत आता इकोफ्रेंडली मूर्ती तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. 

नऊ इंचांपासून ते पाच फुटांपर्यंतच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. चार वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी कागदाच्या पाच फुटांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. यंदाही आणखी दोन सार्वजनिक मंडळांनी नोंदणी केली आहे. चेतना शाळा हे प्रातिनिधिक उदाहरण असले, तरी इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा जपलेल्या अनेक कारागीर व संस्थांकडेही अशीच परिस्थिती यंदा आहे. त्याशिवाय स्वयम्‌, जिज्ञासा या शाळांतील मूर्ती आणि सजावटीच्या साहित्यालाही मोठी मागणी आहे. 

मूर्ती एक्‍स्चेंज 
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्तीचे प्रतीकात्मक विसर्जन करून तीच मूर्ती पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी दुसऱ्या मंडळांना देण्याचा आदर्श पायंडा गेल्या पाच-सहा वर्षांपासून शहरात पडला आहे. सुरवातीला दोन-तीन मंडळांनीच ही संकल्पना उचलून धरली होती. गेल्या वर्षी एकूण पन्नासहून अधिक मंडळांनी मूर्ती एक्‍स्चेंज केल्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh idol will plant seeds of flower this year new concent