ऋतुमानाचे बिघडलेले गणित पुन्हा सुरळीत होऊ दे, चंद्रकांतदादांची गणरायास प्रार्थना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

कोल्हापूर  - ऋतुमानाचे बिघडलेले गणित भविष्यात पुन्हा सुरळीत चालू होऊ दे, अशी प्रार्थना गणेश चरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. यावेळी श्री. पाटील यांनी ही प्रार्थना केली.

कोल्हापूर  - ऋतुमानाचे बिघडलेले गणित भविष्यात पुन्हा सुरळीत चालू होऊ दे, अशी प्रार्थना गणेश चरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. यावेळी श्री. पाटील यांनी ही प्रार्थना केली. 

मिरवणुकीतील मानाचा मानल्या जाणाऱ्या श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीची पालखी मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर माधवी गवंडी, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी खांद्यावर घेतली व मिरवणुकीची अधिकृत सुरुवात झाली.

खासबाग मैदानापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी रात्री बारा वाजताच याठिकाणी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फुलाचा गालिचा तयार करून त्यावर पालखी ठेवली होती. आज सकाळी भगवे फेटे घेतलेले कार्यकर्ते, ढोल - ताशाचा गजर पारंपारिक वाद्यांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले होते. साडेनऊ वाजता पालकमंत्र्यांचे आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीत निरोपाची आरती करण्यात आली व गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे श्रद्धापूर्वक आवाहन करत मिरवणुकीला सुरुवात झाली.

मिरवणूक मार्गात खासबाग मिरजकर तिकटी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मानाचा हा गणपती पाहण्यासाठी अनेक लोक अनेक लोक थांबून होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Visarjan procession stats in Kolhapur