कोल्हापूर : ढोल ताशासह विसर्जन मिरवणूकीत मोरयाचा गजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

कोल्हापूर -  सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणूकीस कोल्हापुरात सुरू झाली. पण ताराबाई रोडवर दुपारचे दोन वाजले तरी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक रेंगाळलीं होती. दुपारी चारनंतर महाद्वार रोड वरील मुख्य मिरवणुकीत जाण्याची उत्सुकता असल्याने मंडळांचे ट्रॅक्टर एकापाठोपाठ थांबून होते.

तटाकडील तालीम मंडळाची मिरवणूक वस्ताद बाबूराव महाडिक चौकात सव्वा दोन वाजता आल्यानंतर ढोल ताशाचा गजर सुरू झाला आणि मिरवणूक मार्ग सळसळला. भगवा झेंडा नाचवत ठेक्याने मार्ग दणाणून सोडल्यानंतर भक्तांच्या उत्साहाला पारावर उरला नाही. 

ताराबाई रोडवरून मुख्य मिरवणुकीत सायंकाळी सहापर्यंत येण्याची या मार्गावरील मंडळे, तालमींची इच्छा असते. उत्तरेश्वर पेठ  वाघाची तालीम, उमेश कांदेकर युवामंच, क्रांती बाॅईज, तटाकडील तालीम मंडळ, रंकाळा तालीम मंडळ, चौपाटी मित्र मंडळ, साई मित्र मंडळांच्या मिरवणुका दुपारी दोन वाजता सरस्वती चित्रपटगृह ते महाडिक चौक मार्गावर होत्या.  

मंडळांमध्ये पुढे ‌जाण्यावरुन वाद होऊ नये, यासाठी
सरस्वती चित्रपट गृहासमोरील रोडवर पोलिसांनी  व्हॅन आडवी लावली होती. त्यामागे मंडळांचे ट्रॅक्टर थांबून होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष हरिश गायकवाड, सचिव राजेंद्र जाधव, बाबा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत तटाकडीलच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Ganesh Idol Visarjan