#ArtiWithSakal : सेलिब्रिटींचा बाप्पा....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

डीएसके विश्‍व, धायरी - अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस हिने आपल्या घरामध्ये शाडूच्या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तिची जाऊ कमर्शिअल आर्टिस्ट असून, तिच्यासह शर्वरीच्या मुलांनी पेपरच्या कागदापासून वडाचे झाड बनविले व पारंब्यांसाठी सुतळीचा वापर केला. पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेला हा देखावा लक्ष वेधून घेत आहे.

गणेशोत्सव2019 : डीएसके विश्‍व, धायरी - अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस हिने आपल्या घरामध्ये शाडूच्या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

तिची जाऊ कमर्शिअल आर्टिस्ट असून, तिच्यासह शर्वरीच्या मुलांनी पेपरच्या कागदापासून वडाचे झाड बनविले व पारंब्यांसाठी सुतळीचा वापर केला. पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेला हा देखावा लक्ष वेधून घेत आहे.

बाणेर - अभिनेत्री आणि नृत्यांगना नूपुर दैठणकर-बाग हिने सासरी पर्यावरणपूरक बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे, नूपुरच्या सासू यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून गणरायाची मूर्ती बनविली. तिला नूपुरने रंग दिला. तसेच, सजावटही कागदांच्या फुलांनी केली आहे. पती सौरभ बाग यांच्याबरोबर तिने गणरायाची पूजा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Arti With Sakal Celebrity sharvari and nupur