
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील चंदा अर्थातच अभिनेत्री दीप्ती सोनावणे-क्षीरसागर यांच्या घरीही गौरी अन् गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. अंधश्रद्धेवर मात करीत अन् प्रथा मोडत तिचे वडील डॉ. पी. डी. सोनावणे हे ४५ वर्षांपासून गणरायाची मनोभावे पूजा करीत आहेत. दीप्तीचा भाऊ डॉ. अभिजित व वहिनी डॉ. मनीषा हे सर्वजण गणेशोत्सव दीपोत्सवाप्रमाणेच साजरा करतात.
पाषाण - ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील चंदा अर्थातच अभिनेत्री दीप्ती सोनावणे-क्षीरसागर यांच्या घरीही गौरी अन् गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. अंधश्रद्धेवर मात करीत अन् प्रथा मोडत तिचे वडील डॉ. पी. डी. सोनावणे हे ४५ वर्षांपासून गणरायाची मनोभावे पूजा करीत आहेत. दीप्तीचा भाऊ डॉ. अभिजित व वहिनी डॉ. मनीषा हे सर्वजण गणेशोत्सव दीपोत्सवाप्रमाणेच साजरा करतात.
हिंगणे खुर्द - ‘सिंधू’ या मालिकेमध्ये भामिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निकिता कुलकर्णी हिच्या घरी पाच दिवसांचाच बाप्पा असतो. मात्र, ती दामोदर सार्वजनिक मंडळात सहभागी होते. २००१ मध्ये या मंडळाची स्थापना झाली असून, तेथूनच तिच्या अभिनयाच्या कलागुणांना वाव मिळाला. त्यामुळे ती बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा करते.