गणेशोत्सव2019 : सकाळी साडेदहालाच मिरवणूक होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, यास मानाच्या गणपती मंडळांनी विरोध केल्याने पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी साडेदहालाच मिरवणूक सुरू होईल, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव2019 : पुणे - मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, यास मानाच्या गणपती मंडळांनी विरोध केल्याने पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी साडेदहालाच मिरवणूक सुरू होईल, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहाला मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर साधारणतः सायंकाळी पाच वाजता संपते. त्यानंतर इतर मंडळे मार्गस्थ होतात. काही मंडळे बेलबाग चौकातून पुढे गेल्यानंतर रात्रीची विद्युतरोषणाईची महत्त्वाची मंडळे रांगेत येतात. त्यामुळे विद्युत रोषणाई केलेल्या इतर मंडळांना पहाटेपर्यंत पुढे जाता येत नाही. यासाठी काही मंडळांनी मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करावी, अशी भूमिका घेतली होती.

यावर चर्चा करण्यासाठी मानाच्या गणपतींसह महत्त्वाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बैठकीस बोलावले होते. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वेळ बदलण्यास विरोध केला. त्यामुळे मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी साडेदहाला सुरू होईल, असे डॉ. वेंकटेशम यांनी सांगितले.

सहआयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले की, गेल्या वर्षी ज्या पद्धतीने मिरवणूक निघाली होती, त्याचप्रमाणे यंदाही मिरवणूक निघेल. सायंकाळी सात वाजता रात्रीचे महत्त्वाचे गणपती रांगेत येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Visarja Miravnuk