
‘आम्ही पहिल्यांदाच गणेशोत्सवाला भेट दिली आहे. मिरवणुकीत वाजविण्यात आलेले पारंपरिक ढोल-ताशा मनाला भावणारे आहेत. सामूहिकरीत्या होणारे ढोल-ताशांचे वादन विलक्षण आहे, अशी प्रतिक्रिया जर्मनीहून आलेल्या रॉबर्ट यांनी दिली. जर्मनीतील मागदेबर्ग येथील रहिवासी असलेले रॉबर्ट आणि त्यांचे मित्र अँड्य्रू व मॅत्थियास कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून ते गणेशोत्सवाला भेट देत आहेत.
गणेशोत्सव2019 : पुणे - ‘आम्ही पहिल्यांदाच गणेशोत्सवाला भेट दिली आहे. मिरवणुकीत वाजविण्यात आलेले पारंपरिक ढोल-ताशा मनाला भावणारे आहेत. सामूहिकरीत्या होणारे ढोल-ताशांचे वादन विलक्षण आहे, अशी प्रतिक्रिया जर्मनीहून आलेल्या रॉबर्ट यांनी दिली. जर्मनीतील मागदेबर्ग येथील रहिवासी असलेले रॉबर्ट आणि त्यांचे मित्र अँड्य्रू व मॅत्थियास कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून ते गणेशोत्सवाला भेट देत आहेत.
कर्वेनगर येथील रहिवासी असलेले शंतनू घुले या तिघांचे मित्र आहेत. शंतनू यांनी सकाळपासून त्यांना मानाचे गणपती, दगडूशेठ आणि इतर मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची झलक दाखवली. अँड्य्रू म्हणाले, ‘‘संपूर्ण शहर एकाच उत्सवात रममाण झालेले मी पहिल्यांदाच पाहत आहे. आम्ही या क्षणाचा मनसोक्त आनंद घेतला आहे.’’ उद्या दोघेही विसर्जन मिरवणूक संपल्यावर जर्मनीला परत जाणार आहेत.