Ganesh Festival : मंगलमय सूरांचा गणेशोत्सव साजरा करुयात

Article on Ganesh Festival
Article on Ganesh Festival

गणेशोत्सवात शास्त्रीय संगीत गायकीची घरंदाज परंपरा लाभलेल्या अनेक घराण्यांनी त्यांची गायन सेवा वाहिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला जगात अत्यंत श्रीमंत संगीत म्हणून वाखाणण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाला ओंगळवाणे स्वरुप आले आहे. ते अश्‍लिल गाणी लावून त्यावर बिभत्सपणे नाचण्यामुळे. हा घृणास्पद प्रकार थांबायला हवा. अर्थात हे आपल्या सर्वांच्याच हातात आहे.

उत्सवात गणपती देवापुढे दारू पिऊन अश्‍लिल चाळे करून नाचणे म्हणजे देवतेचा कळत नकळत अपमानच होतो.मांडवाखाली झुगाराचे अड्डे भरवून देवतेच्या पावित्र्याची विटंबना होत आहे. त्यापेक्षा देशभक्तीपर आणि पोवाडे व धार्मिक गाणी लावून गणेशोत्सव साजरा करूयात. 

कर्णकर्कश्‍य आवाज अश्‍लिल गाणी लावुन मुला मुलींवर असभ्य संस्कार करण्यापेक्षा त्यांना चांगली दिशा देऊयात. विसर्जन मिरवणूकीत गेल्या काही वर्षांत अश्‍लिल गाण्यांवर तरुणाई नाचताना आपण सारेच दरवर्षी पाहातो.आता हे थांबले पाहिजे. मुला मुलींचे अश्‍लिल गाण्यावरील नाचण्याचे फेसबुक लाईव्ह, व्हिडिओ करुन सोशल मिडियावर अपलोड केले जातात आणि धिस इज इंडियन गणेश फेस्टिव्हल म्हणून जगभर दाखविले जाते. गणेशोत्सवात हमखास हे दिसतेच आणि त्या अश्‍लिल गाण्यावरच्या ठेक्‍यावर तरूण मुला मुलींसह म्हातारे मध्यम वयीन महिला पुरूष नाचल्याची चर्चा होते. 

उत्सवाच्या गलिच्छ वास्तवाला काही मोजकीच मंडळी जबाबदार आहेत. त्यामुळे चांगली विधायक कार्य करणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्याला मात्र गालबोट लागत आहे. नागरिकांनीच मनावर घेऊन आता खुलेआम बिनधास्तपणे उडत्या चालीच्या गाण्यांवर नाचणाऱ्या तरुणाईला थांबविले पाहिजे. भविष्याचे विपर्यास चित्र पाहायला लागू नये.यासाठीच नागरिक हो, पुढे या आणि चांगल्या देशभक्तीपर, देवाधर्माची गाणी गणेशोत्सवात लावण्याचा आग्रह धरा. निमूटपणे बसू नका. अहो, गणेशोत्सवाचे मूळचे पावित्र्य राखणे आपल्याच हातात आहे. सामुहिक शक्ती आणि प्रत्येकाच्या सकारात्मक मानसिकतेतून उत्सवातली अश्‍लिल व उडत्या चालीची गाणी बंद करा. 

गाव ते शहर प्रबोधन फेर्या, दिंड्या काढून कार्यकर्ते, नागरिकांनाच आता लोकांना समजावून सांगायचे आहे. अहो,आतातरी सावध व्हा. महाराष्ट्रातील सर्व विधायक कार्य करणार्या चांगल्या गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची चाललेली विटंभना, बिभत्सपणा, ओंगळपणा आणि अश्‍लिल स्वरूप बंद पाडण्याची वेळ आली आहे. विधायक कार्य करणाऱ्या चांगल्या गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी देखील पुढाकार घ्यायची वेळ आली आहे.पाऊल टाका.जनता सत्कर्माला साथ देईलच.जय गणेश. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com