esakal | नांदेड : गुलालमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

sp.jpg

आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे स्वागत गणेशमंडळांनी गुलालमुक्त, डीजेमुक्त व पुष्पयुक्त करावे असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले.

नांदेड : गुलालमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे स्वागत गणेशमंडळांनी गुलालमुक्त, डीजेमुक्त व पुष्पयुक्त करावे असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले.

देगलूर पोलिस उपविभागाची शांतता समितीची बैठक रविवारी (ता. एक) देगलुर पोलिस ठाण्यात आयाेजीत केली होती. या बैठकित राठोड बोलत होते.

यावेळी पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, नगराध्यक्ष शिरसेवार, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, पंचायत समितीचे सभापती देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 
राठोड म्हणाले की, गणेश मंडळांनी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अन्य धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचेल असे वर्तन आपल्या मंडळाकडून होता कामा नये.

गणराय आपले आदर्श असून, त्यांच्या या उत्सव काळात शांतता बाधीत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. तसेच या वर्षाचा हा उत्सव गुलालमुक्त, डीजेमुक्त करून पुष्पयुक्त साजरा करून नवा पायंडा किंवा देगलुरकरांचा आदर्श पुढे करा असे आवाहन राठोड यांनी केले.

उत्सवादरम्यान अवास्तव खर्च टाळून आलेली निधी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी द्या असेही आवाहन त्यांनी केले. 

loading image
go to top