पुणे - गणरायाची प्रतिष्ठापना व मूर्ती खरेदी करण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेने बुधवारी (ता. १२) व गुरुवारी (ता. १३) वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी
केले आहे.

बंद असलेले रस्ते/पर्यायी रस्ते
शिवाजी रस्ता - गाडगीळ पुतळा ते गोटीराम भय्या चौक.
पर्यायी रस्ता - गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे, संताजी घोरपडे पथावरून, सूर्या हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून, स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
कुंभारवेस चौक - डेंगळे पूल, साठे चौक ते शिवाजी पूल (महापालिका) सर्व वाहनांना बंदी.
पर्यायी रस्ता - पुणे स्टेशनकडून येणाऱ्या वाहनांनी शाहीर अमर शेख चौकातून आरटीओ चौक, अभियांत्रिकी महाविद्यालयामार्गे जावे, पुणे स्टेशनहून फरासखाना परिसरात येणाऱ्या वाहनांनी कुंभारवेस चौकातून डावीकडे वळून पुढे जावे.
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) - सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर रस्ता बंद.