पिंपरी - गणरायाचे आगमन झाले की बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक सगळ्यांच्याच घरी तयार होतात. खवा व मलई मोदकाबरोबर चॉकलेट व अंजीर मोदक बाजारात आले आहेत. खव्याच्या मोदकामध्ये पिस्ता व ऑरेंज तर मलईमध्ये मॅंगो, अंजीर, चॉकलेट मोदकांना ग्राहकांची पसंती आहे.

गणरायाला उकडीच्या मोदकाचा नवैद्य दाखविण्यात येतो. मिठाई व्यावसायिकांकडे तब्बल १० ते १२ प्रकारच्या डिझायनर मोदकांची ‘रेंज’च बाजारात उपलब्ध आहे. बाप्पाप्रमाणे प्रत्येकालाच मोदक खायला आवडतो. पण, तांदळाच्या पिठीच्या उकडीच्या मोदकांपेक्षा स्वीट मार्केटमध्ये बाप्पासाठी काही वेगळे, खास आणि विविध रंगात, स्वादात दुकानात मोदक उपलब्ध आहेत. मावा, अंजीर, काजू, बदाम, पिस्ता आदींच्या पेस्टने डिझायनर मोदकांची निर्मिती केली जाते. उकडीचे मोदक २५ रुपये नग, तर तळणीचे मोदक ४८० रुपये किलो आहेत. केसरी मोदकांची ५०० रुपये, तर काजूचे मोदक ९०० रुपये किलो आहेत. बेक केलेले मोदक, फ्रूट मोदक, मिक्स मोदक, कॅरामल मोदक, चॉकलेट मोदकांना महिलांची पसंती मिळत आहे.
२५ रुपयांपासून ते सुमारे एक हजार रुपयांपर्यंत डिझायनर मोदक विक्रीसाठी आले आहेत. म्हैसूरपाक, बुंदी लाडू, बुंदीलाही मागणी वाढत आहे, अशी माहिती मिठाई व्यावसायिक सुभाष बन्सल यांनी दिली.