Ganesh Festival : तळेगावात गणराय वाजतगाजत विराजमान

गणेश बोरुडे 
Thursday, 13 September 2018

भगव्या रंगाच्या टोप्या, कुर्ते, फेटे, उपरणे घालून अबालवृद्धांनी आपापल्या गणेशमुर्ती आणण्यासाठी स्टेशन आणि गाव विभागातील विक्री स्टाॅलवर सकाळपासूनच गर्दी केली होती. सकाळचा मुहूर्त असल्याने स्थापना पुजेचे साहित्य घेण्यासाठी गणेशभक्तांनी स्टेशनच्या भाजीमंडई जवळील बाजारपेठेत गर्दी केली होती.

तळेगाव स्टेशन : पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात घरगुती आणि सार्वजनिक गणोशोत्सव मंडळात गणराय विराजमान झाले.

भगव्या रंगाच्या टोप्या, कुर्ते, फेटे, उपरणे घालून अबालवृद्धांनी आपापल्या गणेशमुर्ती आणण्यासाठी स्टेशन आणि गाव विभागातील विक्री स्टाॅलवर सकाळपासूनच गर्दी केली होती. सकाळचा मुहूर्त असल्याने स्थापना पुजेचे साहित्य घेण्यासाठी गणेशभक्तांनी स्टेशनच्या भाजीमंडई जवळील बाजारपेठेत गर्दी केली होती. बच्चेमंडळींचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. सार्वजनिक गणेश मंडळांनी सजवलेले रथ आणि ट्राॅलीवर गणेशमुर्तींचे मुखवटे वस्त्राने झाकून ढोल ताशांच्या दणदणाटात वाजतगाजत मिरवणूका काढून सायंकाळी गणेशस्थापना केली. गणेशाच्या आगमनाने मनामनात चैतन्य पेरले आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच गौरी आगमनाचीही लगबग सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळे देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीला लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganapati arrives at Talegaon on occasion og ganesh festival