
गणपती घरी आले की घरात खाण्यापिण्याची चंगळ ऐरवीपेक्षा जरा जास्तच असते, नाही का! गणपती बाप्पांसाठी दहा दिवस नवनवीन प्रसाद कोणता बनवावा याची लिस्ट तर काहीजण आधीच बनवून ठेवतात. पण तुमच्या या लिस्टमध्ये 'हा' प्रसादाचा पदार्थ आहे का? अहो नसेल तर लगेच शामिल करा. गणपती बाप्पाला खुश करायचं आहे ना.. मग या पदार्थांची रेसिपीखास गणेशोत्सव निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
केळीचे मोदक -
2 वाटी सोजीचा रवा, दिड वाटी साखर, 2 चमचे पांढरे तीळ, चवीप्रमाणे वेलची पावडर हे सगळं एका बाउलमध्ये घ्या. त्यात 3 केळी कुस्करुन टाका. मिश्रण नीट मिक्स् करुन घ्या. मिश्रणाला मोदकाचा आकार द्या. आता तुप गरम करा आणि तुपात हे मोदक तळून घ्या. केळीचे मोदक तयार.