बाप्पांना आज निरोप; विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होईल.

पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होईल.

अब्दागिरी, मानचिन्हांसह, पारंपरिक वेशभूषेत महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग, नयनमनोहर देखावे आणि विद्युत रोषणाईंनी सजलेले रथ, सनई चौघड्याचे मंजुळ स्वर, बॅंडच्या सुरावटी, ढोल-ताशाच्या थर्राराचा आनंद घेण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. पोलिस प्रशासन आणि महापालिकेने विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे.

भाविकांनो, इकडे लक्ष द्या....

लहान मुलांना शक्‍यतो गर्दीत घेऊन जाऊ नये. 
महिलांनी दागिने घालून गर्दीत जाणे टाळावे. 
थंडी, ताप, सर्दी असणाऱ्यांनी गर्दीत जाणे टाळावे. 
शक्‍यतो कोरडे खाद्यपदार्थ जवळ असावेत.
गर्दीत नातेवाईक अथवा मित्र मैत्रिणींची चुकामूक झाल्यास स्वयंसेवक, पोलिस मित्र व पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.  
लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या खिशात नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांकाची चिठ्ठी ठेवा. 
मौल्यवान वस्तू दागिने सोबत बाळगू नका. 
व्हॉट्‌स्‌ॲप, ट्विटर ,फेसबुक या सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहा. 
चोरांपासून सावध राहा.
चोरी-घरफोडी टाळण्यासाठी घराच्या सुरक्षेची काळजी घेऊन घराबाहेर पडा. 
दुचाकी वाहने उभी करताना साखळीच्या कुलपांचा वापर करा. 
मुख्य मिरवणूक मार्गापासून वाहने लांब पार्क करा. 
संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. 
एकाच ठिकाणी उभे राहून गर्दी करू नका. 
आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीत सहभागी होणे टाळावे. 
मिरवणूक पाहण्यासाठी ‘फीडर पिलर’वर उभे राहू नका.

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक 

रुग्णालये 
ससून - २६१२८०००
कमला नेहरू - २६०५३८४१
पूना - २४३३१७०६
सह्याद्री - २५४०३०००
भारती - २४३६५८४८
सरदार वल्लभभाई पटेल कॅंटोन्मेंट रुग्णालय - २६४५०५३०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय - २५८१२३६३

आपत्कालीन सेवा
विघ्नहर्ता न्यास डॉ. मिलिंद भोई ९८२२६२१५५६
डॉ. नंदकिशोर बोरसे ९४२२०३२६९६
डॉ. नितीन बोरा ९८२२९६९६६१
डॉ. कुणाल कामठे ९८९०६१६३६५
सदाशिव कुंदेन ९९२१५७४४९९
डॉ. शंतनू जगदाळे ९०११९१६६०७
डॉ. राजेंद्र जगताप ९९२२३४३४६८

रुग्णवाहिकेची सोय 
नागनाथपार सार्वजनिक गणपती ट्रस्ट व रोटरी क्‍लब पुणे साउथ यांच्या वतीने सदाशिव पेठेतील हौदाजवळ रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध आहे. संपर्क -
दत्तात्रय पाषाणकर - ९८२२०००५०३
प्रीतेश केदारी - ९४२२३०७१०८
 

एन. एम. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डीओलॉजी, रोटरी क्‍लब ऑफ पुणे मिडटाउन, ताराचंद रुग्णालय यांच्या सहकार्यातून 
वैद्यकीय मदत केंद्रांची सोय पुढील ठिकाणी 

बेलबाग चौक. 
संभाजी पोलिस चौकी.
स. प. महाविद्यालय. 
एन. ई. पूरम चौक. 
अप्पा बळवंत चौक. 
दोन फिरत्या रुग्णवाहिका.
डॉक्‍टर व परिचारिकांचे १२४ जणांचे पथक. 

दूरध्वनी
पोलिस नियंत्रण कक्ष  - १०० किंवा २६१२२८८० व २६१२६२९६ 
अग्निशामक दल - १०१ 
पुणे महापालिका : २६४५१७०७
पिंपरी चिंचवड महापालिका : २७४२३३३३
पुणे कॅंटोन्मेंट - २६४५२१५९
(अग्निशामक दल : २६४५०४५३) 
खडकी कॅंटोन्मेंट  : २५८१७५१०
(अग्निशामक दल : २५८१९१५५) 

महावितरण 

लक्ष्मी रस्त्यावर नियंत्रण कक्ष 
मोबाईल व्हॅनसह अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक
टोल फ्री क्रमांक - १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५

वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि नो-पार्किंग 

लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, बगाडे रस्ता, गणेश रस्ता, गुरुनानक रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता. पुणे सातारा रस्ता, प्रभात रस्ता.

येथे करता येईल पार्किंग 
पुलाची वाडी, नदीपात्रालगत
एन. ई. पूरम चौक ते हॉटेल विश्‍व
दारूवाला पूल ते खडीचे मैदान   गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस  
काँग्रेस भवन ते मनपा रस्ता   एच. व्ही. देसाई कॉलेज
जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता
हमालवाडा पार्किंग, नारायण पेठ

 ढोल-ताशा पथकांतील वादकांनी ही खबरदारी घ्यावी 
स्वतःजवळ लिंबू आणि पाण्याची बाटली बाळगावी. 
खडीसाखरेची पुडी असावी. 
कोरडे खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत. 
पावसाची शक्‍यता गृहीत धरून रेनकोट बाळगावा.
ढोल वाजवताना दुसऱ्याला लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

विसर्जन घाट, हौद 
नटेश्‍वर  पांचाळेश्‍वर  संगम  अष्टभुजा  वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर 
ओकांरेश्‍वर  पटवर्धन घाट   नेने घाट  आपटे घाट
बापूजा घाट  विठ्ठल मंदिर येथील घाट  ठोसरपागा येथील घाट 
गरवारे महाविद्यालयाची मागील बाजू  राजाराम पूलनजीकचा घाट
चिमा उद्यान येरवडा येथील घाट  बंडगार्डन येथील घाट
वारजे कर्वेनगर (गल्ली क्रमांक एक नदीकिनारी)
दत्तवाडी येथील घाट   औंधगाव येथील घाट  

मंडळ आणि स्वयंसेवक 
प्रथमोपचार पेटी बाळगावी. 
हरविलेल्यांना पोलिसांपर्यंत पोचविण्यास सहकार्य करावे. 

हवामान 
अकाश अंशतः ढगाळ राहील 
एक-दोन सरींची शक्‍यता

विसर्ग 
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मंगळवारी सकाळी अकरानंतर एक हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. बुधवारी मिरवणूक संपेपर्यंत हा विसर्ग सुरू राहील. धरण क्षेत्रात अधिक पाऊस झाल्यास विसर्ग वाढविण्यात येईल.

कसबा गणपती मंडळासमोर कलावंतांचाही ढोल वाजणार

गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही कलावंत ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे. यंदा मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळात ढोलवादन करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता बेलबाग चौकापासून हे पथक ढोल-ताशा वादन करणार आहे. या पथकामध्ये अमित रानडे याच्यासह अभिनेता सौरभ गोखले, अस्ताद काळे, श्रीकर पित्रे, केतन क्षीरसागर, ऋषिकेश वांबुरकर, श्रुती मराठे, शाश्‍वती पिंपळीकर, प्राजक्ता माळी, स्वप्नाली पाटील आदी कलाकार सहभागी होणार आहेत. या पथकामध्ये कलाकारांसह निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, इंजिनिअर यांचाही समावेश आहे. जवळपास दीड महिन्यांपासून ते ढोलवादनाचा सराव करत आहेत.

दुधाचे मोफत वाटप

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांना साने डेअरीतर्फे मोफत दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. 

आवश्‍यक सेवा-सुविधा

गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात सर्वत्र व्यवस्था करण्यात आली असून, मुख्य मिरवणूक मार्गासह विविध रस्त्यांवर स्वागत कक्ष उभारले आहेत. टिळक चौकात मुख्य स्वागत कक्ष उभारला आहे. तसेच, महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालये, विसर्जन घाट, हौद, नदीपात्र-कालवे, लोखंडी टाक्‍या असलेल्या ठिकाणी विसर्जनासाठी आवश्‍यक सेवा-सुविधा उपलब्ध असतील. विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि कामगारांचीही नेमणूक केली आहे. शहराच्या विविध भागांतील विसर्जन घाटांसह सेवा-सुविधांची महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली. 

अग्निशामक यंत्रणा 
विसर्जनाच्या प्रत्येक ठिकाणी दोन जीवरक्षक
नदीपात्र व कालव्याजवळ दोरखंड
पुलांच्या परिसरात नेकलेस दोरखंड.
पाण्याचे टॅंकर.
मिरवणूक मार्गांवर अग्निशामक दलातील जवानांची नेमणूक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 ganpati visarjan

व्हिडीओ गॅलरी