जल्लोष गणेशोत्सवाचा, आनंद देखाव्यांचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

जालना - ‘देवा श्रीगणेशा’, ‘ताशाचा आवाज तरतर झाला रे, गणपती माझा नाचत आला’ या आणि अशा अनेक गीतांची मंडळासमोरील धूम, ढोल पथकांचे सादरीकरण, लक्षवेधी देखावे असा गणेशोत्सवाचा जल्लोष सध्या सुरू आहे. शहरातील विविध भागांत रविवारी (ता.तीन) देखावे पाहण्यासाठी जालनेकरांनी मोठी गर्दी केली होती. 

जालन्यात २५ ऑगस्टपासून गणेशोत्सवाचा आनंदोत्सव सुरू आहे. दरम्यान, विविध गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा, स्वच्छता आणि विविध देवी-देवतांचे देखावे जालनेकरांसाठी उभारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी रविवारी सायंकाळपासूनच जालनेकरांनी मोठी गर्दी केली होती.

येथील गांधी चमन, शिवाजी महाराज पुतळा, राजेंद्र प्रसाद रोड परिसरात विविध गणेश मंडळांनी बसविलेल्या बाप्पांच्या आकर्षक मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी जालनेकरांनी रविवारी एकच गर्दी केली होती. शिवाजी पुतळा परिसरातील अनोखा गणेश मंडळाने उभारलेल्या भव्य आकर्षक देखावा पाहण्यासाठी मोठी झुंबड उडाली. या वेळी महिला आणि बच्चेकंपनीची संख्या सर्वाधिक होती. देखावा संस्मरणीय राहावा म्हणून अनेकांनी आपल्या मोबाईल फोनवरून फोटो काढले, व्हिडिओही घेतले. राजेंद्र प्रसाद मार्गावर ठिकठिकाणी यंदा मोठ्या आकारच्या श्री मूर्ती स्थापन करण्यात आल्या. त्याचेही आकर्षण दिसून आले. विविध देखावेही जालनेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.  दररोज विविध आकर्षक धार्मिक कार्यक्रम शहरातील विविध गणेश मंडळांसमोर पार पडत असून सोबतच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशांच्या रंगीत तालमीचे निनाद शहरात घुमत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 jalna ganesh ustav

टॅग्स
व्हिडीओ गॅलरी