पौराणिक देखाव्यांवर बिबवेवाडीत भर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

बिबवेवाडी - शतकोत्तर रौप्यमहोत्सवाला साजेसे बिबवेवाडी गावठाण व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक देखावे व विधायक कामे केलेली आहेत. इंदिरानगरमधील अंकुश मित्र मंडळाचा पार्वतीचे वडील राजा दक्षचा शंकराने तांडवनृत्य करीत केलेल्या वधाचा देखावा भाविकांना आकर्षित करत आहे. अखिल इंदिरानगर मित्र मंडळाचा म्युझिकवर चालणारे लयबद्ध कारंजे व काल्पनिक पंखा महलचा देखणा देखावा आहे. 

अखिल बिबवेवाडी गावठाण श्री गणेश मित्र मंडळाचा काल्पनिक हत्ती महल हा देखावा भाविकांची गर्दी खेचत आहे. बिबवेवाडी ओट्यावरील रणवीर मित्र मंडळाचा काल्पनिक महल मंडळाच्या मूर्तीचे आकर्षण वाढवत आहे. मार्केट यार्डमधील हमालनगर मित्र मंडळाने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सव काळामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. मंडळाची गणपतीच्या आकर्षक मूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 

स्वामी विवेकानंद मार्गावरील आझाद मित्र मंडळाने गुजरातमधील कष्टभजन येथील हनुमान मंदिराचा थर्माकोलमधील देखावा केलेला असून, मंडळ गणेशस्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणूक काढत नसून, वर्गणीच्या पैशातून विविध सामाजिक संस्थांना मदत केली जाते, असे मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सांगितले. 

राजीव गांधीनगरमधील शिवरुद्र प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने गणपती साधेपणाने साजरा करून, मंडळातर्फे पाचशे पंचावन्न देशी झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्यापैकी उत्सवकाळात दोनशे पन्नास झाडे लावलेली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राहुल पाखरे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh ustav bibwewadi