Ganesh Festival : थेरगाव, वाकडमध्ये जिवंत, पौराणिक देखावे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 September 2018

पिंपरी - गणेशोत्सवानिमित्त थेरगाव आणि वाकडमधील मंडळांनी जिवंत व पौराणिक देखावे उभारले आहेत. त्यामध्ये प्लॅस्टिक बंदी, आई-वडिलांचे जीवनातील महत्त्व, किल्ले संवर्धन आदी विषयांचा समावेश आहे.

समाजप्रबोधनाबरोबरच कलाकारांना देखाव्यांतून व्यासपीठ मिळते. त्याशिवाय या देखाव्यांमध्ये भाविकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे मंडळांनी जिवंत देखाव्यांना प्राधान्य दिले आहे. वाकड परिसरात पौराणिक देखावे, आकर्षक सजावटीवर भर दिला आहे. 

थेरगाव-दत्तनगर येथील जय महाराष्ट्र मित्रमंडळाने आई-वडिलांचे जीवनातील स्थान या विषयावर देखावा सादर केला. सम्राट मित्र मंडळाने ‘किल्ले संवर्धन’ हा विषय मांडला आहे. विशाल मित्र मंडळाने ‘सैराट छंद, प्लॅस्टिक बंद’ हा देखावा सादर केला. आनंद पार्क मित्र मंडळाने ‘विसरलेले आई-वडिल’ हा विषय मांडला आहे. वनदेव आनंदवन मित्र मंडळाने राजस्थानी राजवाडा उभारला आहे. त्याशिवाय येथे जत्रा भरविल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. 

सन्मित्र क्रीडा मंडळाने गणरायाला आकर्षक सजावट केली आहे. थेरगाव-संतोषनगर येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने ‘छत्री केली पर्वताची..., अगाध लीला श्रीकृष्णाची...’  हा पौराणिक देखावा सादर केला आहे. थेरगाव-लक्ष्मणनगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने ‘आता तरी जागे व्हा...’ हा देखावा केला आहे. थेरगाव-गुजरनगर येथील धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचा झुंबर महालाचा देखावा लक्ष वेधून घेतो. 

वाकड-कावेरीनगर येथील कावेरीनगर पोलिस युवक मित्र मंडळ, वाकड रस्ता येथील सुवर्णदीप मित्र मंडळाने गणरायाला आकर्षक सजावट केली आहे. श्रीगणेश प्रतिष्ठानचा अष्टविनायक सुवर्ण मंदिराचा देखावा लक्षणीय आहे. उत्कर्ष मित्र मंडळाने सोमनाथ मंदिराचा देखावा केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2018 ganpati decoration