साडवली - देवरुखमधील मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमातील मुलीं दरवर्षी दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतात. यंदा याच मुलींनी मातीची गणेशमूर्ती तयार केली आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना केली आहे.
साडवली - देवरुखमधील मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमातील मुलीं दरवर्षी दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतात. यंदा याच मुलींनी मातीची गणेशमूर्ती तयार केली आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना केली आहे.
गोकुळमध्ये १७ मुली राहतात. उत्सवात टाकावु वस्तुंपासुन पर्यावरण पुरक सजावट करतात. कलात्मक रांगोळी काढली जाते व पुजा, आरती होवुन या मुली विविध खेळ करुन हा दीड दिवसांचा उत्सव साजरा करतात.
यंदा अधिक्षिका वर्षा कांबळे यांनी या मुलींना या उत्सवासाठी मार्गदर्शन केले. गोकुळपासुन बेर्डे सभागृहापर्यंत या मुलींनी गणरायाला मोरया मोरयाच्या गजरात आणले व त्याची पुजा करुन गणरायाचे आशीर्वाद घेतले.