Ganesh Festival : जांभुळणीमध्ये हिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन

सदाशिव पुकळे
Thursday, 20 September 2018

झरे  - जांभुळणी (ता. आटपाडी) येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडतंय. पूर्वीपासून हिंदू मुस्लिम भेद भाव न ठेवता दोन्ही ही धर्माचे लोक एकत्र येत सर्व सण आनंदाने साजरे करतात. सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम युवक आहे तर अखंड हरिनाम सप्ताहमध्ये मुस्लिम बांधव ज्ञानेश्वरी वाचतात अशा अनेक घटना पहावयास मिळतात.                                                    ,

गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये मुस्लीम समाजाचा मोहरम आल्याने हिंदू मुस्लीम बांधवानी दोन्ही उत्सव एकत्रित साजरा करून एक्याचे दर्शन घडविले. 

या गावातील नागरिकांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे सरपंच संगीता मासाळ यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Moharam integration special